सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण हे राजशिष्टाचारानुसारच- महापौर जयश्री महाजन

जळगाव – आज जळगाव महापालिकेतील महापूर यांच्या कार्यकाळाच्या शेवटच्या दिवशी त्यांनी केलेल्या विकास कामांची माहिती दिली. याप्रसंगी उपमहापौर कुलभूषण पाटील ,विरोधी पक्षनेते सुनील महाजन व महापालिकेतील इतर सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.याप्रसंगी महापौर सौ.जयश्री महाजन म्हणाल्या की, मी अडीच वर्षाच्या कालावधीत माझ्या हातून अनेक चांगली कामे करण्याचा,धाडसी निर्णय घेण्याचा, तसेच शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. मात्र विकासाचा अनुशेष भरून काढणे इतक्या लवकर शक्य नाही. महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या आवारात लोहपुरुष सरदार वल्लभाई पटेल यांचा पुतळा बसवण्याचा निर्णय गेल्या दिला उपनगरात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूपणाचा निर्णय घेतला गेला
महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला गेला. लगेच तो अमलात आणून नुकतेच त्या पुतळ्याचेही अनावरण थाटात संपन्न झाले आहे.
जी कामे केलीत ती पुरेशी नाहीत, याची मला नम्र जाणीव आहे. तरी काही चांगले ठराव गेल्या कालावधीत महासभेतून पारीत करून घेतले आहेत. यात प्रामुख्याने
1) जळगाव शहरात असलेल्या तीनशे स्क्वेअर फुटापर्यंतच्या रहिवाशी मालमत्तांची घरपट्टी माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला गेला. याशिवाय महिलांच्या नांवे असलेल्या मालमत्तांच्या घटपट्टीत 5% सवलतीचा निर्णय यापुर्वीच घेतला गेला होता.
त्याची अंमलबजावणीही होत आहे.
पायाभूत सुविधांमध्येही अनेक कामे गेल्या अडीच वर्षात करण्यात आली. या कामाच्या बाबतीत अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यावर मात करून विरोधकांचेही सहकार्य घेवून कामांना मंजुरी देण्यात आली. यात प्रामुख्याने आरसीसी गटार, स्लॅब व कल्व्हर्ट,रस्तांचे काँक्रीटीकरण, रस्तांचे डांबरीकरण, हायमास्ट, नवीन पोल, संरक्षक भिंत, पेव्हर ब्लॉक, पूल बांधणे, बगीचा विकास, ओपनजिम यांचा समावेश आहे.
१) जळगाव महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच माझ्या काळात मी महापौर सेवा केंद्राची स्थापना केली व जनतेच्या समस्या सोडवून न्याय देण्याचा प्रयत्न केला.
२) माझ्या कारकिर्दीत सर्वात जास्त मनपा निधीतून विकासकामे करण्यात आली काही प्रस्तावित आहे.
३) म.न.पा.त प्रथमच नगरसेवक निधी हा हेडचा अर्थसंकल्पात समावेश करून त्याप्रमाणे प्रत्येक नगरसेवकास विकास कामांसाठी २५ लाख निधी देण्यात आला.
४) म.न.पा.त प्रथमच वार्षिक जिल्हा नियोजन मंडळाचा मिळणारा निधी प्रत्येक वार्डनिहाय समान वाटप करण्याचे धोरण ठरविण्यात आले.
५) मनपाच्या न हरकत प्रमाणपत्रानुसार P.W.D. मार्फत जळगाव शहरात १०० कोटी व ८५ कोटींच्या रस्ताच्या कामांना पावसाळ्यानंतर प्रत्यक्ष सुरुवात होईल.
६) शहरातील विविध भागांतील विविध कामांचे कार्यादेश दिलेले आहेत. पावसाळ्या नंतर ती प्रत्यक्षात सुरु होतील.
11) केंद्रशासनाची महत्वाकांक्षी अमृत योजना 2 ला मान्यता दिली गेली. याअंतर्गत मेहरूण तलावाचा स्रोत असलेल्या तलाव क्षेत्राचे पुर्नजीवीत करण्याचा निर्णय घेण्यात आला.
12) शहरातील रामदास कॉलनी व त्या सारख्या अनेक ओपन स्पेसवर सामाजिक संस्था व व्यावसायिक प्रतिष्ठाने यांच्या सहाय्याने बगिचे विकसीत करण्याचा निर्णय आम्ही घेतला. ती विकसित केली.
13) जळगाव शहरात विविध ठिकाणी लोकसहभागातून स्त्री व पुरुषांसाठी अत्याधुनिक प्रसाधन गृहे उभारण्यात आली.
14) दिव्यांग व्यक्तीच्या रेशनपोटी देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ केली.
15) मोहाडी शिवारातील गट क्रमांक 60 मध्ये अत्याधुनिक क्रिडा संकुल विकसीत करण्याचा निर्णय घेतला गेला. त्यामुळे क्रीडापटूंना प्रोत्साहन मिळेल.
16) जळगाव शहरातील मेहरूण येथील ३६ एकर जागेत विभागीय क्रीडासंकुलासाठी महासभेत ठराव पारित करण्यात आलेला होता. यासाठी तत्कालीन क्रीडा मंत्री व सध्याचे ग्रामविकास मंत्री मा. गिरीशजी महाजन यांच्या पाठपुरावामुळे २४० कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. मी त्यांचे मन:पूर्वक आभार व्यक्त करते.
17) जळगाव मनपा इमारतीमध्ये हिरकणी कक्षाची उभारणी करण्यात आली.
18) शहरात दिवंगत कवी पद्मश्री ना. धों. महानोर यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.
19) मनपा इमारतीतील वीज बचतीसाठी गोलाणी मार्केटच्या छतावर सोलर एनर्जी प्लान्ट बसविण्याचा निर्णय घेतला गेला. त्यामुळे पालिकेच्या लाखो रुपयांच्या खर्चाची बचत होणार असून हा निधी विकासकामांसाठी वापरता येणार आहे.
20) शहराचा विस्तार वाढलेला आहे. एकाठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे जाता येणे शक्य व्हावे यासाठी पालिकेची शहर बस सेवा सुरू करण्याचा मोठा निर्णय आम्ही घेतला. लवकरच त्याची अंमलबजावणी होणार आहे.
21) विद्यार्थासाठी मनपा च्या सानेगुरुजी ग्रंथालयाच्या इमारतीत अत्याधुनिक डिजिटल लायब्ररी स्पर्धा परीक्षा अभ्यासिका सुरु करण्याचा व इमारतीच्या नुतनिकरणाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यासाठी पाठपुरावा करून मा.आ.सत्यजितजी तांबे यांनी १ कोटी निधी उपलब्ध करून दिला. मी त्यांचेही आभार मानते.
पायाभूत सुविधांव्यतिरिjक्त घेतलेले हे काही प्रमुख निर्णय आहेत.मात्र अद्यापही अनेक क्षेत्रात काम करणे शक्य आहे.
या कार्यकाळात माजी मंत्री सुरेशदादा जैन, पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील, राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे जेष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा या सर्वांचे आशिर्वाद व गंभीर साथ लाभल्यामुळे मी ही वाटचाल करू शकली अशी प्रतिक्रिया महापौर जयश्री महाजन यांनी दिली.