
मुंबई दि:३ एप्रिल, ‘मिडिया मेल’ न्यूज चे वृत्त १००% खरे ठरलेले असून आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून जळगाव लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी उद्धव ठाकरे यांनी घोषित केलेली आहे. त्या मागील वृत्ताची लिंक खाली दिलेली आहे.
जळगाव मतदारसंघासाठी उद्धव ठाकरेंकडून भाजपच्या ‘या’ नेत्याला उमेदवारी फिक्स ?
जळगाव मतदारसंघातील उमेदवारीसाठी हर्षल माने, कुलभूषण पाटील, ललिता पाटील यांच्या नावांसह भाजपचे खासदार उन्मेष पाटील, उन्मेश पाटील यांच्या पत्नी संपदा पाटील, करण पवार यांचीही नावे चर्चेत होती. तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील, डॉ. उत्तमराव महाजन यांनीही उद्धव ठाकरे यांची शनिवारी रात्री भेट घेतली होती.
जळगाव जिल्ह्यातील उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची रविवारी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर बैठक झाली. या बैठकीत भाजपच्या पदाधिकारी असलेल्या दोन जणांच्या नावावर चर्चा झाली. भाजपमध्ये असलेले पारोळा येथील माजी नगराध्यक्ष करण पवार, भाजप विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांच्या पत्नी संपदा पाटील या दोघांच्या नावावर चर्चा झाली होती. आज पारोळा येथील भाजपचे करण पवार यांच्या नावाची घोषण झालेली आहे.
भाजपचे खासदार उन्मेश पाटील यांच्या पत्नी संपदा पाटील तर दुसरीकडे भाजपचे करण पवार या दोघांची नावे जळगाव लोकसभेसाठी आघाडीवर होती. परंतु, आज करण पवार यांचे नाव निश्चित झाले आहे.