Advertisement नंदग्राम गोधाम वाटरपार्क,अंजाळे
अर्थकारणक्राईम/कोर्टमहाराष्ट्रमुंबई

जिल्हा बँकेवर सायबर दरोडा , तब्बल तीन कोटींच्या चोरी प्रकरणी SIT करणार तपास

मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने विशेष तपास पथकाद्वारे चौकशी करणार- राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

मुंबई, दि. २५ : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची संगणकीय यंत्रणा हॅक करून ग्राहकांच्या खात्यातील तब्बल तीन कोटी पेक्षा जास्त रक्कम एका अज्ञात सायबर हल्लेखोरांनी हरियाणाच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केले. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन विशेष तपास पथकाद्वारे चौकशी करण्यात येईल, असे राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या उत्तरात सांगितले.

याबाबत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती.यामुळे प्रचंड खळबळ उडालेली आहे.कारण राज्यातील अनेक जिल्हा बँका या सायबर हल्ल्यामुळे अलर्ट झालेल्या असून यामुळे आता बँकांच्या सायबर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री डॉ. भोयर म्हणाले की, बँकेत झालेली नोकरभरती व इतर गैरव्यवहारांचीही चौकशी होणार आहे. सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी आणि तपास जलद गतीने करण्यासाठी महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प नवी मुंबई, महापे येथे सुरू करण्यात आला आहे. राज्यभरातील सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी येथे सायबर पोलीस स्टेशनसह सहा विभाग कार्यरत असतील. प्रकल्प Go Live च्या अंतिम टप्प्यात असून, लवकरच संपूर्णतः कार्यान्वित होणार आहे. हा प्रकल्प राज्यातील सायबर सुरक्षा आणि गुन्हे नियंत्रणासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button