काश्मिरात झाली या मोसमातील पहिली बर्फवृष्टी,या वर्षी देशी-विदेशी कोट्यवधी पर्यटकांनी दिली काश्मीरला भ
श्रीनगर दि-26 सप्टेंबर, भारतातून एकीकडे मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झालेला असतानाच देशाच्या उत्तर भागात मात्र शईतलहरई वाहू लागलेल्या असून आता थंडीची चाहूल लागताना दिसत आहे. उत्तराखंडपासून राजस्थानपर्यंत आता मान्सूननं परतीची वाट धरण्यास सुरुवात केलेली असतानाच हिमालयाच्या कुशीत उत्तरेकडे असणाऱ्या आणि पृथ्वीवरील नंदनवन अशी ख्याती असणाऱ्या काश्मीरमध्ये मात्र चित्र काहीसं वेगळं असल्याची बाब समोर आली आहे. कारण, इथं हिवाळ्याची चाहूल लागली असून, गुलमर्ग ,खिलनमर्ग, पहलगाम भागात या मोसमातील पहिली बर्फवृष्टी झाली आहे. त्यामुळे काश्मीरमध्ये पर्यटनास वाव मिळणार असून इथले स्थानिकांना मोठा रोजगार उपलब्ध होणार आहे.या वर्षी आतापर्यंत विक्रमी कोट्यवधी पर्यटकांनी काश्मीरला भेट दिल्याच आकडेवारी नुसार समोर आलेले आहे. विशेष म्हणजे यात विदेशी पर्यटकांची संख्या लाखोंच्या घरात आहे.भारत सरकारने काश्मीरचे 370 कलम हटविल्यानंतर इथे मोठ्या प्रमाणावर विकास कामे सूरू असून अनेक मोठे प्रकल्प, पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आलेल्या आहेत.
आभाळातून भुरभुरणारा कापूर खाली पडावा तसा बर्फ जम्मू काश्मीरच्या पर्वतीय भागांमध्ये काल पडला आणि इथं स्थानिकांसोबतच भटकंतीसाठी आलेल्या पर्यटकांनी आनंद व्यक्त केला. सोनमर्ग, गुलमर्ग, शेषनाग या आणि अशा अनेक भागांमध्ये रविवारपासूनच बर्फवृष्टीची सुरुवात धाली. बंदीपोरा येथील गुरेझ व्हॅली, तुलैल येथील किलशे टॉप अशा भागांमध्ये बर्फवृष्टीनंतर निसर्गाचं रुप पालटलं. सर्वत्र बर्फातीच चादर पाहायला मिळाली आणि खऱ्या अर्थानं या भागाला पृथ्वीवरचं ‘स्वर्ग’ का म्हटलं जातं हेच अनेकांच्या लक्षात आलंय.
पर्यटनाचा काळ नजीक
दरवर्षी डिसेंबर ते मार्च या कालावधीत जम्मू काश्मीर भागामध्ये येणाऱ्या पर्यटकांचा आकडा मोठा असतो. पण, हल्लीच्या दिवसांमध्ये इथं येण्याचे एकाहून अधिक पर्याय हाती असल्यामुळं ऑक्टोबरच्या अखेरपासूनच पर्यटकांची गर्दी इथं पाहायला मिळते. फक्त बर्फाच्छादित प्रदेशच नव्हे, तर गुलमर्ग येथे विंटर स्पोर्ट्सही असल्यामुळं इथं अॅडव्हेंचर प्रेमींची आवर्जून हजेरी असते. शिवाय परदेशात लोकप्रिय असणारा स्किईंग प्रकारही इथल्या बर्फाच्या मैदानांवर करणं शक्य होतं.
सध्याच्या घडीला जम्मू काश्मीर भागात झालेल्या या बर्फवृष्टीमुळं इथं काश्मीर खोऱ्यातील तापमानाचा आकडा बऱ्यापैकी कमी झाला आहे. सध्याच्या घडीला इथं कमाल तापमान 15 अंश तर किमान तापमान 3 अंश सेल्शिअस इतकं असून, श्रीनगरमध्ये मात्र तुलनेनं तापमानाचा आकडा जास्त असल्याचं लक्षात आलं आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील दोन दिवसांसाठी जम्मू काश्मीरमध्ये वातारण कोरडं असेल. तेव्हा आता तुम्ही इथं नेमके कधी जाताय याचा बेत आखायलाच सुरुवात करा.