30 प्रवाशी घेऊन जाणारी खाजगी बस पुलावरून कोसळली, छत्रपती संभाजी नगर-जालना रोडवरील दुर्घटना
जालना |26 सप्टेंबर, जालना-छत्रपती संभाजीनगर रोडवर एक खाजगी बस पुलावरून कोसळल्याची घटना घडलेली आहे.यामध्ये 25 प्रवासी जखमी झाले असून 9 जण गंभीर जखमी आहेत. पुण्याहून नगरकडे जात असताना हा भीषण अपघात घडला आहे. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने ती पुलाखाली कोसळली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक गावकरी व जालना पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलेलं आहे. यामध्ये 25 प्रवाशी जखमी झाले असून 9 जण गंभीर जखमी आहेत.
काल रात्री 12 वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर जालना महामार्गावर बदनापूरजवळ चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट खाली कोसळल्याची घटना घडली आहे. पूजा ट्रव्हल्सची ही बस होती. ही बस (एम एच 40 सी 6969) पुण्याहून नागपूरकडे जात होती. बदनापूरजवळून जात असताना हा अपघात घडला. या अपघातात बसमधील 25 प्रवाशी जखमी झाले आहेत. तर 9 प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.