एकनाथ खडसेंचा जावई, आणि रोहिणी खडसेंचा पती प्रांजल खेवलकरला पुण्यात अमली पदार्थांच्या रेव्ह पार्टीत अटक

पुणे: पुण्यातील कथित रेव्ह पार्टी वर पोलिसांनी छापेमारी केल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील उच्चभ्रू खराडी भागात एका फ्लॅटमध्ये ही कथित रेव्ह पार्टी सुरू होती. पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ, दारू, हुक्काचे सेवन सुरू होते. खराडी भागातील एका फ्लॅटमध्ये हाउस पार्टीच्या नावाखाली रेव्ह पार्टी सुरू होती. रेव्ह पार्टी करणाऱ्यांमध्ये 3 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या छापेमारी मध्ये अमली पदार्थ, हुक्का, दारू जप्त करण्यात आला आहे. यामध्ये एकनाथ खडसेंचा जावई आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसेंचा पती प्रांजल खेवलकर हा देखील सहभागी असल्याची माहिती समोर आली आहे.

एकनाथ खडसेंचा जावई प्रांजल खेवलकरला फ्लॅटमधे पार्टी करताना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. पुण्यातील खराडी भागातील एका सोसायटीतील फ्लॅटमधे पार्टी सुरु होती. प्रांजल खेवलकरसह त्याचा एक मित्र आणि तीन महिला पार्टीत सहभागी झाल्या होत्या. या पार्टीत दारु, हुक्का आणि काही प्रमाणात अंमली पदार्थांचे सेवन होत असल्याचा पोलिसांचा दावा आहे. प्रांजल खेवलकरसह ताब्यात घेतलेल्या इतरांना पोलीसांनी वैद्यकीय चाचणीसाठी ससुन रूग्णालयामध्ये नेण्यात आलं आहे. रोहिणी खडसे सध्या या प्रकरणाची माहिती घेत आहेत. त्यामुळे सध्या बोलायला नकार दिला आहे.

पुण्यातील रेव्ह पार्टीमधून राजकीय पक्षाच्या मोठ्या नेत्या रोहिणी खडसे यांच्या पतीला ताब्यात घेतलं आहे. या सर्वांनी काय घेतलं होतं ? अंमली पदार्थ होते का ? याचा तपास सुरू आहे, तर पोलिसांना याबाबतची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याठिकाणी छापा टाकला, त्यानंतर पोलिसांकडून या सर्वांना ताब्यात घेण्यात आलं आहे, त्यांच्या रक्ताची तपासणी सुरू आहे, त्याचबरोबर त्यांनी काही अंमली पदार्थांचे सेवन केले होते का ? याचीही तपासणी सुरू आहे. पार्टी सुरू असतानाच पोलिसांनी याठिकाणी छापा टाकला यावेळी त्यांना काही प्रमाणात अंमली पदार्थ सापडले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी पक्षातील नेत्यांवर विविध प्रकारचे गंभीर आरोप करणाऱ्या आमदार एकनाथराव खडसे आणि रोहिणी खडसे आता या प्रकरणामुळे काय भूमिका घेतात, याकडे जळगाव जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून आहे. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर विविध प्रकारचे गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले असून याबाबत वारंवार पत्रकार परिषद घेऊन जोरदार टीका केलेली आहे. मात्र आता त्यांचे जावई एका अमली पदार्थांच्या पार्टीत दोन मध्यरात्री महिलांसह सापडल्याने आता ते काय भूमिका घेतात, आणि सत्ताधारी नेते हे प्रकरण आता कसं उचलून धरतात, याकडे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.












