जळगावमहाराष्ट्रमुंबईराजकीय

‘तापी मेगा रिचार्ज’ प्रकल्पासाठी मंत्री रक्षा खडसेंची केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांसोबत सकारात्मक बैठक

Mediamail news impact on tapi mega recharge project meeting

#Tapi mega recharge project नवी दिल्ली- दिनांक २७ जून, रावेर लोकसभेच्या खासदार श्रीमती रक्षा खडसे यांची राज्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर ‘mediamail.in’ न्यूजने जळगाव जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या तापी मेगा रिचार्ज प्रकल्प गेल्या काही वर्षांपासून रेंगाळलेला असल्याबाबत वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी त्या अनुषंगाने बऱ्हाणपूर आणि जळगाव जिल्हा प्रशासनाची संयुक्त बैठक घेतली होती.दोन दिवसांपूर्वी केंद्रीय जलशक्ती मंत्री आणि खान्देश पुत्र असलेले नामदार सी.आर.पाटील यांनी सुद्धा अमळनेर तालुक्यातील तापी निम्न प्रकल्पाचे धरणात रूपांतर करण्यासाठी आवश्यक असणारी प्रकिया आणि कार्यवाही पूर्ण करण्यासाठी सकारात्मकता दर्शविल्यानंतर आता तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाच्या विविध मंजुरी मिळण्यासाठी राज्यमंत्री रक्षा खडसे यांना आश्वासित केलेलं आहे.

दरम्यान, विदर्भातील बुलढाणा जिल्हा व अकोला जिल्ह्यासाठीचा महत्वपूर्ण “जिगांव प्रकल्प” व महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्यांसाठीचा महत्वाकांशी “तापी महाकाय पुनर्भरण योजना (मेगा रिचार्ज प्रकल्प)” तसेच बोदवड उपसा सिंचन योजना, कुऱ्हा वडोदा इस्लामपूर उपसा सिंचन योजना, शेळगांव बॅरेज ई. प्रकल्प बाबत आज नवी दिल्ली येथे केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी घेतली केंद्रीय जलशक्ती मंत्री श्री.सी.आर.पाटील यांची भेट सदर दोन्ही योजनांबाबत प्राथमिक माहिती देऊन सदर योजनांना गती देणेबाबत चर्चा केली आहे.बुलढाणा जिल्हयातील नांदुरा तालुक्यातील जिगांव गावाजवळ पूर्णा नदीवर “जिगांव प्रकल्प” प्रगतीपथावर असून, प्रकल्पाद्वारे बुलडाणा जिल्हयातील ६ तालुके व  अकोला जिल्हयातील २ तालुके यामधील एकूण १,१६,७७० हे अवर्षणप्रवण क्षेत्रावर १५ उपसा सिंचन योजनांद्वारे सिंचन निर्मिती करण्याचे उद्दिष्ट आहे. केंद्रीय जल आयोग च्या तांत्रिक सल्लगार समिती द्वारे प्रकल्पास रु.७,७६४.३९ कोटी किंमतीच्या प्रस्तावास मान्यता प्राप्त झालेली असून, केंद्र शासन पुरस्कृत बळीराजा जलसंजिवनी योजना (BJSY) मध्ये जिगांव प्रकल्पाचा समावेश करून योजनेच्या निकषानुसार केंद्र शासनाचा २५ % हिस्सा एकूण रु.१२०५.४८ कोटी निधी प्रकल्पाला मंजुर करण्यात आला आहे. प्रकल्पीय नियोजनानुसार जुन-२०२६ अखेर प्रकल्पात १८३ दलघमी अंशतः पाणीसाठा करुन ६१,०२५ हे क्षेत्र सिंचनाखाली आणणे प्रस्तावित आहे.

तसेच महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्यांसाठीचा महत्वाकांशी “तापी महाकाय पुनर्भरण (मेगा रिचार्ज प्रकल्प)” योजनेत तापी नदीतून गुजरातला वाहून जाणाऱ्या ४५.५० टीएमसी पाण्याचा वापर होणार आहे. त्यामुळे ४ लाख ११ हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे. या योजनेमुळे प्रत्यक्ष सिंचन १ लाख २ हजार हेक्टरमध्ये होणार असून, महाराष्ट्रात २४ हजार हेक्टर तर मध्य प्रदेशात ७८ हजार हेक्टरमध्ये होईल. पुनर्भरणाद्वारे अप्रत्यक्ष लाभ महाराष्ट्राला २ लाख ११ हजार हेक्टर तर मध्य प्रदेशला ९६ हजार हेक्टर असा एकूण ३ लाचा १० हजार हेक्टरमध्ये अप्रत्यक्ष लाभ होणार आहे, अशा रीतीने महाराष्ट्राला एकूण २ लाख ३७ हजार हेक्टरमध्ये तर मध्य प्रदेशला १ लाख ७४ हजार हेक्टरमध्ये लाभ होणार आहे. भूमिगत बंधारे, गॅबीअन बंधारे, पुनर्भरण विहिरी, इंजेक्शन वेल्स व साठवण बंधारे बांधून त्याद्वारे पुनर्भरण करून खोल गेलेली भूगर्भातील पाणी पातळी उंचावणे आणि निर्माण होणाऱ्य़ा पाणी साठय़ाद्वारे सिंचन करणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे.
    “जिगांव प्रकल्प” योजनेचे उद्दिष्ट साध्य करणेकरीता अदयावत किंमतीस केंद्रीय जल आयोग ची मान्यता व Investment Clearance प्राप्त करणे, तसेच प्रकल्पाच्या नियोजनानुसार वेळेत कामे पूर्ण करण्याकरीता केंद्र शासनामार्फत भरीव अर्थ सहाय्य प्राप्त होणे आवश्यक आहे. तर “मेगा रिचार्ज प्रकल्प” साठी मध्यप्रदेश व महाराष्ट्र राज्य यांचे मार्फत नियोजनासाठी संयुक्त बैठक घेणे आवश्यक असल्याची केंद्रीय जलशक्ती मंत्री श्री.सी.आर.पाटील यांना केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी माहिती देऊन दोन्ही प्रकल्पांना गती देणेबाबत मागणी केली असता, त्यांनी तत्काळ योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिलेले आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button