महिलांना दरमहा १५०० रुपये, तर वर्षाला ३ गॅस सिलेंडर मोफत मिळणार – वित्तमंत्री अजित पवारांची अधिवेशनात घोषणा
मुंबई-दिनांक २८ जून, राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या मुंबईतील विधानभवनात सुरू असून आज तिसऱ्या दिवशी वित्तमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्याचा अर्थसंकल्प मांडत आहेत. आता नुकतेच त्यांनी सभागृहात महिला, शेतकरी व विद्यार्थ्यांसाठी त्यांनी अनेक मोठ्या लाभाच्या घोषणा केलेल्या आहेत.
त्यांच्याकडून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आलेली असून प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत दिले जाणार आहेत.
तसेच राज्यातील सर्व उपकेंद्रात स्तन व गर्भाशयाच्या मोफत वैद्यकीय चाचणीसाठी निधीची तरतूद करण्यात आलेली आहे.
तसेच महत्वाकाक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा सुद्धा करण्यात आलेली आहे. या अंतर्गत वय २१ ते ६० वर्षांपर्यंतच्या महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्यात येतील. त्यासाठी ४६ हजार कोटींचा निधी दिला जाईल. १ जुलै २०२४ पासून ही योजना सुरू होईल अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी आता सभागृहात मांडलेली आहे. अजून आणखी कोणत्या घोषणांचा पाऊस पडतो. याकडे महाराष्ट्राचे लक्ष्य लागून आहे.