दिवाळखोरीत निघालेला ‘लवासा’ प्रकल्प खरेदी करणाऱ्या कंपनीवर ईडीच्या धाडी
शरद पवारांचा ड्रीम प्रोजेक्ट लवासा
मुंबई दि-२२, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या स्वप्नातील ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि दिवाळखोरीत निघालेला लवासा प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे. याचं कारण म्हणजे दिवाळी खोरीत निघालेला हा प्रकल्प विकत घेणाऱ्या कंपनीच्या मुंबई स्थित कार्यालयामध्ये अंमलबजावणी संचालनालयाच्या दिल्लीच्या अधिकाऱ्यांनी आज धाडी टाकलेल्या आहेत.
पुणे जिल्ह्यातील पहिलं खासगी हिल स्टेशन अशी ओळख मिळवलेल्या असणाऱ्या लवासा प्रकल्पाची काही वर्षांपूर्वी विक्री करण्यात आली होती. मात्र हा प्रकल्प खरेदी करणाऱ्या ग्रुपला आता ईडीची नोटीस बजावण्यात आली आहे. मुंबईतील डार्विन ग्रुपने लवासा प्रकल्प खरेदी केला होता. लवासा प्रकल्प दिवाळखोरीत होता. प्रकल्पाच्या विक्रीला मान्यता दिल्याने दिवाळखोरी संपुष्टात आली आहे.
दिवाळखोरीत निघालेला लवासा प्रकल्प डार्विन कंपनीने विकत घेतला होता. या कंपनीचे माक अजय सिंग हे आहेत. आता अजय सिंग यांच्यावर ईडीकडून धाडी टाकल्या जात आहेत. ईडीच्या दिल्ली विभागीय कार्यालयाकडून कारवाई करण्यात आली आहे. ईडीने ७८ लाखांची रोकड, २ लाखांचे विदेशी चलन जप्त केले आहे. याशिवाय काही महत्त्वाची कागदपत्रेही ईडीच्या हाती लागली आहेत. याबाबतचे वृत्त ANI या वृत्तसंस्थेने दिलेले आहे.