देशाच्या अखंडतेसाठी बलिदान देणाऱ्या स्व. डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथी निमित्त भुसावळ भाजपातर्फे श्रद्धांजली

भुसावळ शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान येथील डॉ मुखर्जी यांच्या पुतळ्यास भारतीय जनता पार्टीतर्फे त्यांच्या पुण्यतिथी निमित्त पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली देण्यात आली. यावेळी भुसावळ शहरातील स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी “डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी अमर रहे”च्या घोषणा दिलेल्या आहेत.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे दक्षिण शहराध्यक्ष किरण कोलते, उत्तर शहराध्यक्ष संदीप सुरवाडे, ग्रामीण अध्यक्ष गोलू पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अनिल वारके, व्यापारी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष मनोज बियाणी, माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, राजेंद्र नाटकर, प्रमोद नेमाडे, जिल्हा उपाध्यक्ष सतीश सपकाळे, प्रवीण इखणकर माजी नगरसेवक पवन बुंदेले, बापू महाजन, ललित मराठे, पुरुषोत्तम नारखेडे, ॲड बोधराज चौधरी, प्रा दिनेश राठी, राजेंद्र आवटे, अजय नागराणी सागर चौधरी, कुणाल येवले, राहुल तायडे, कैलास शेलोडे, चेतन बोरोले, रवींद्र खरात, बिसन गोहर, विलास अवचार, शंकर शेळके, राजू खरारे, किरण पाटील, समाधान पाटील, राजेश चंदन, गौरव वाघ, प्रेमचंद तायडे, गोपी राजपूत, अमित असोदेकर, सागर जाधव यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.













