पुणे,सातारा आणि कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटाच्या चाचण्या केल्या !, पुण्यात पकडल्या गेलेल्या 2 दहशतवाद्यांकडून धक्कादायक माहिती समोर
सिरियात दहशतवादी प्रशिक्षण घेतल्याची माहिती
पुणे दि-25 : गेल्या आठवड्यात पुण्यातील कोथरूड येथे तीन दहशतवाद्यांना पुणे पोलिसांनी अटक केली होती. कोथरूड भागातून दुचाकी चोरण्याच्या तयारीत असताना महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान ऊर्फ अमीर अब्दुल हमीद खान (वय २३) आणि महम्मद युनूस महम्मद याकूब साकी (वय २४, दोघेही सध्या रा. मिठानगर, कोंढवा, मूळ रा. हरमाला कुलकुंडी, रतलाम, मध्यप्रदेश) यांना अटक करण्यात आली होती.
दरम्यान, त्यांचा तिसरा साथीदार आणि म्होरक्या महंमद शहनवाज आलम (वय ३१) हा अंधाराच्या फायदा घेत पसार झालेला आहे.
हे तिन्ही दहशवादी पुण्यात मोठा घात पात करण्याच्या तयारीत होते. पुण्यात मोठा बॉम्बस्फोट करणार होते, अशी धक्कादायक माहिती एनआयएने केलेल्या चौकशीत पुढे आली आहे. पुणे पोलिसांच्या या कारवाईमुळे मोठा कट हा उधळला गेला आहे.
पुणे,सातारा,कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोट चाचण्या
कोथरूड पोलिसांनी नाकाबंदीत पकडलेल्या तिन्ही दहशतवाद्यांनी पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी केल्याचे दहशतवाद विरोधी पथकाने न्यायालयात सादर केलेल्या अहवालातून समोर आलेले आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी या चाचण्या केल्या होत्या त्या ठिकाणी आता दहशतवाद विरोधी पथकाने चौकशी सुरू केली आहे.
तसेच, आरोपींवर दाखल गुन्ह्यात बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यान्वये कलम वाढ करण्यात आली आहे.
दोन्ही दहशतवाद्यांची पोलिस कोठडी संपत असल्याने दहशतवाद विरोधी पथकाने दोघांना जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले. त्यावेळी सत्र न्यायाधीश एस. व्ही. कचरे यांच्या न्यायालयाने त्यांना पाच ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
दहशतवाद विरोधी पथकाने तपासा दरम्यान दोन्ही आरोपींच्या घराची झडती घेतली त्यामध्ये विविध वस्तू आढळून आल्या. त्यात इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह पांढरी पावडर सापडली होती. ती पावडर स्फोटकच असल्याचे एक्स्प्लोसिव्ह वेफर डिटेक्टर मध्ये स्पष्ट झाले आहे. तसेच पोलिसांच्या डॉग स्कॉडने देखील यासंबंधी पॉझिटिव्ह रिपोर्ट दिला आहे. ही पावडर नेमके कोणते स्फोटके आहे, त्यासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविला असून त्याचा अहवाल येणे बाकी आहे.
घातपातासाठीच्या सर्व पातळ्या आत्मसाद
इस्लाममध्ये सांगितलेल्या पवित्र गोष्टींसाठी जीव गेला, तरी ते करण्यासाठी त्यांची तयारी होती. त्यानुसार त्यांचे ब्रेन वॉश करण्यात आले होते. घातपातासाठी दहशतवादी विचारधारा स्वीकारण्यापासून प्रशिक्षण आणि त्यानंतर प्रत्यक्षात कारवाई करेपर्यंतच्या सर्व पद्धती दोघांनी आत्मसाद केल्या होत्या.