राजकीय

पुणे पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीला 300 शब्दांचा निबंध लिहायची शिक्षा देणाऱ्या न्यायाधीशांवर कारवाईचा बडगा

#Pune Porsche Car Accident मुंबई दि-18 जुलै 2024, पुण्यातील कल्याणी नगर भागात दिनांक 19 मे  शनिवारी मध्यरात्री एका अल्पवयीन मद्यधुंद युवकाने भरधाव पोर्शे या आलिशान कारच्या धडकेत दुचाकीवरील एक तरुण व तरूणी अशा दोघांचा मृत्यू झाला होता. आरोपी हा पुण्यातील बड्या बिल्डर बापाचा लेक असल्याने त्याला बालगुन्हेगार कायद्याच्या पळवाटेने लगोलग जामीनही मिळाला. त्यानंतर या घटनेविरोधात पुण्यासह महाराष्ट्रातील जनमानसांत तीव्र संतापाची लाट निर्माण झालेली होती. गरिबांचा जीव एवढा स्वस्त झालाय का ? असे प्रश्न लोक सरकारला अजूनही विचारत होते. 
कायदा पायदळी तुडवून मद्यधुंद अवस्थेत कार चालवून अपघातातील दोघांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या अल्पवयीन मुलाला पुण्यातील बाल हक्क मंडळाचे प्रधान दंडाधिकारी मानसी परदेशी आणि त्यांचे इतर दोन सदस्य डॉ एल एन दानवडे आणि केटी थोरात यांचा समावेश असलेल्या मंडळासमोर हजर करण्यात आले होते. त्यानंतर बाल न्याय मंडळाने अल्पवयीन आरोपीला ३०० शब्दात निबंध लिहून वाहतूक विभागात काम करण्यास सांगून काही अटींवर काही तासांत जामीन मंजूर केला होता.त्यानंतर पोलिसांनी त्या अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतलं. पण आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला बालन्याय मंडळासमोर उभं करण्यात आलं होतं. बालन्याय मंडळाने त्या अल्पवयीन मुलाला 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची आणि इतर काही थातूरमातून शिक्षा देऊन आणि त्याचा तात्काळ जामीन मंजूर केला होता. 


मात्र, त्या अल्पवयीन मुलाला दिलेल्या जामिनाच्या आदेशाच्या प्रतीवर दानवडे यांचीच स्वाक्षरी आहे.
त्यामुळे या प्रकरणात काही तरी संशयास्पद असल्याचे दिसून येत होते. आरोपीच्या जामीन अर्जावर मंजुरीची सही करणाऱ्या या सदस्यांची या प्रकरणात आता चौकशी पूर्ण झाली आहे. महाराष्ट्राचे महिला व बालविकास आयुक्त प्रशांत नरनवरे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन ही उच्च स्तरीय चौकशी समिती स्थापन केली होती.
या प्रकरणाच्या चौकशीसाठी चार सदस्यीय समिती स्थापन करण्यात आलेली होती.या समितीने अल्पवयीन आरोपीला अपघातावर 300 शब्दांत निबंध लिहून जामिनावर सोडणाऱ्या बाल न्यायिक बोर्डाच्या दोन सदस्यांच्या जुन्या रेकॉर्डची चौकशी केली आहे. त्यात काही बाबी चौकशी समितीला संशयास्पद आढळून आलेल्या आहेत.
राज्य सरकारने बाल न्याय मंडळाच्या ज्या न्यायाधीशांनी हा निर्णय दिला आहे. त्यांची आता चौकशी पूर्ण केली आहे. याशिवाय, मंडळामध्ये एक मुख्य दंडाधिकारी देखील असतो, ज्याची नियुक्ती न्यायपालिकेद्वारे केली जाते, त्याची देखील या प्रकरणी चौकशी झालेली आहे.
पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे. बालन्याय मंडळाच्या दोन शासकीय सदस्यांवर पदाचा दुरुपयोग करून कर्तव्यात कसूर केल्याचा ‘ठपका’ ठेवत याप्रकरणी शिस्तभांगाची कारवाई करण्याची शिफारस महिला आणि बालविकास विभागाने राज्य सरकारकडे केली आहे. या दोन सदस्यांनी अल्पवयीन आरोपीला जामीन दिला होता, त्यामध्ये काही त्रुटी आणि अनियमितता असल्याची तक्रार आता महिला आणि बालविकास खात्याने केली आहे. 
जामीन प्रक्रियेमध्ये अनियमितता 
या अल्पवयीन मुलाला जामीन मंजूर करण्याच्या प्रक्रियेत विविध त्रुटी आणि अनियमितता आढळून आल्या असून त्या बाबतचा अहवाल आज राज्य सरकारकडे पाठवण्यात आलेला आहे.
अल्पवयीन आरोपीच्या जामिनाच्या निर्णयावर देशभरातून संतापजनक तीव्र प्रक्रिया उमटलेल्या होत्या. त्यानंतर महिला आणि बाल विकास आयुक्तांनी या सदस्यांच्या चौकशीसाठी समिती नेमली होती. तसेच त्या दोघांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यावर या सदस्यांनी दिलेल्या खुलाशाने समितीची समाधान झालेले नसून या प्रकरणात अनियमितता आढळून आले असे अधोरेखित करणारा अहवाल राज्य सरकारकडे पाठवलेला आहे. आता राज्य सरकार यांच्यावर काय कारवाई करते याकडे राज्याचे लक्ष लागून आहे.
दरम्यान, उच्च न्यायालयाने अल्पवयीन मुलाला बालनिरीक्षण गृहातून मुक्त करण्याचे आदेश दिले असले तरी सुद्धा पुणे पोलिसांनी या आदेशा विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे. 

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल याच्या 17 वर्षाच्या मुलानं दारुच्या नशेत भरधाव वेगानं आलिशान पोर्शे गाडीने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दोन आयटी अभियंत्यांचा जागीच मृत्यू झाला. अनिश अवधिया (27 वर्षे) आणि अश्विनी कोष्टा यांचा या अपघातामध्ये जागीच मृत्यू झाला होता. पुण्यातील कल्याणीनगरमध्ये झालेल्या अपघातात पोर्शे गाडीचा वेग इतका भरधाव होता की अश्विनी कोस्टा या 15 फूट दूर फेकल्या गेल्या. 
या प्रकरणात यापूर्वी पुण्यातील ससून हॉस्पिटलमधील  फॉरेन्सिक लॅबचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर या दोन डॉक्टरांना कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेली आहे. 
फॉरेन्सिक लॅबचे सीएमओ डॉ. श्रीहरी हळनोर यांनी हे सगळे ब्लड सँपल घेतले आणि रिप्लेस केले होते.तसेच दोन पोलिस कर्मचारी यांना देखील या प्रकरणात निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणात आतापर्यंत मुख्य आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलासह त्याचे आई ,वडील , आजोबा अशा कुटुंबातील सर्व सदस्यांना अटक करण्यात आलेली आहे. याप्रकरणात अजूनही काही जणांची या घटनेशी संबंधित पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button