Advertisement
जळगावमहाराष्ट्रमुंबईराजकीय

पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त भुसावळ भाजपने राबविले विविध सामाजिक उपक्रम, अहिल्यादेवी जागर मॅरेथॉन व महिला मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

भुसावळ – भारतीय जनता पार्टी भुसावळ शहरतर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त भुसावळ शहरातील लोणारी समाज मंगल कार्यालय येथे महिला मेळावा तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी जागर मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, प्रतिष्ठा महिला मंडळ अध्यक्ष रजनी सावकारे भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष किरण कोलते संदीप सुरवाडे, महिला मोर्चा अध्यक्ष अनिता आंबेकर, माजी शहराध्यक्ष युवराज लोणारी, प्रदेश सचिव अजय भोळे, परीक्षित बऱ्हाटे यांची विशेष उपस्थिती होती. मेळाव्यात महिलांकरिता अहिल्यादेवींच्या जीवनावर आधारित वकृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. तसेच विविध स्पर्धांमध्ये विजेत्या स्पर्धाकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी जागर मॅरेथॉन
मेळावा संपन्न झाल्यानंतर उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत जळगाव रोड वरील पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यात आले. अहिल्यादेवी स्मारक ते सरदार वल्लभभाई पटेल पुतळ्यापर्यंत शेकडो महिलांनी जागर मॅरेथॉन मध्ये उस्फूर्तपणे सहभाग घेतला. जागर मॅरेथॉनला कॅबिनेट मंत्री सावकारे यांनी हिरवा झेंडा दाखविला.
दरम्यान, या कार्यक्रमास माजी नगरसेविका मीना लोणारी, प्रीती पाटील, अनिता सपकाळे, दिपाली बऱ्हाटे, प्रीती कोलते, पल्लवी वारके, वैशाली सैतवाल, प्रतिभा बोचरे, रेखा धूपे, वंदना सोनार, अरुणा पाटीलआदीं महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा लोखंडे यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी मुळेच आज देशात काशी विश्वेश्वर मंदिर पाहण्यास मिळत आहे- नामदार संजय सावकारे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी आपल्या कारकिर्दीत देशभरात अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला. विविध सामाजिक सुधारणा करून सतीसारख्या प्रथेला विरोध केला. सातबाराची संकल्पना ही त्यांनीच रुजू केली. त्यांनी केलेले कार्य आपल्या सर्वांना नेहमीच प्रेरणा देत राहील.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button