Advertisement
क्राईम/कोर्टजळगावमहाराष्ट्रमुंबईराजकीय

पोलिसांना पोलीस ठाण्यात जाऊन अश्लील भाषेत शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी आ.एकनाथ खडसेंविरोधात गुन्हा दाखल

भुसावळ -दि-11/02/5026, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे विधान परिषद आमदार एकनाथ खडसे यांच्याविरोधात पोलिसांना सावदा पोलीस ठाण्यात जाऊन अश्लील भाषेत शिवीगाळ आणि दमदाटी केल्याप्रकरणी रावेर तालुक्यातील सावदा पोलीस स्टेशनला या घटनेसंदर्भात  नोंदवण्यात आली आहे. पुणे येथील भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणी कालच मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्या आजामिनपत्र वॉरंट वर तात्पुरती स्थगिती दिली होती. आणि आज अशा प्रकारच्या गुन्ह्याची नोंद झालेली आहे.
घटनेची पार्श्वभूमी आणि तपशील असा…
दिनांक 11 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 12:31 ते 12:45 वाजेच्या दरम्यान, विधान परिषद सदस्य  एकनाथराव गणपतराव खडसे  हे सावदा पोलीस स्टेशनच्या आवारात आले होते. त्यावेळी ते सावदा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल पुंडलिक पाटील यांच्याशी संवाद साधत होते.
फियादी (तक्रारदार) विशाल पाटील यांच्या म्हणण्यानुसार, खडसे यांनी तासखेडा (ता. रावेर) येथील गौण खनिज (minor minerals) संबंधित गुन्हा का दाखल केला नाही, असा सवाल केला. त्यानंतर त्यांनी फियादीला अपमानास्पद भाषेत बोलून “तुम्ही G खातात” असे म्हटले. याशिवाय, खडसे यांनी अँटी-करप्शन विभागाचा ट्रॅप (जाळे) लावण्याची धमकी दिली. तसेच, सावदा पोलीस स्टेशनमध्ये नोंदवलेल्या गुन्हा क्रमांक 23/2026 (कलम 303(2)) या प्रकरणातील संबंधित महाराष्ट्र शासनाच्या एका मंत्र्यांना अश्लील भाषेत मोठ्याने शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.
दाखल गुन्हा आणि कलमे
या घटनेच्या अनुषंगाने सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक 30/2026 नोंदवण्यात आला आहे. हा गुन्हा भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 च्या विविध कलमांनुसार दाखल करण्यात आला आहे:
याशिवाय, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 112 आणि कलम 117 अंतर्गतही कारवाई करण्यात आली आहे.
फियादी विशाल पुंडलिक पाटील हे स्वतः पोलीस निरीक्षक म्हणून या GD साठी जबाबदार अधिकारी आहेत. सदर तक्रारीचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी, मुक्ताईनगर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार हा तपास सुरू आहे.  या प्रकरणामुळे जळगाव जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे, कारण एकनाथ खडसे हे राज्यातील ज्येष्ठ नेते आणि विधान परिषद सदस्य आहेत. भोसरी येथील कथित भूखंड घोटाळ्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून ते चर्चेत आहेत. आजच्या या प्रकरणाची अधिक माहिती पोलीस तपासातून समोर येईल. तसेच एकनाथ खडसे आता या संदर्भात काय बोलतात ? याकडेही जनतेचे लक्ष लागून आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Related Articles

Back to top button