बाबा सिद्दिकींना Y दर्जाची पोलिस सुरक्षा असताना हल्लेखोरांचा एन्काऊंटर का होऊ शकला नाही ? मोठी माहिती समोर
Baba siddique murder | मुंबई दि-13/102024, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर काल शनिवारी संध्याकाळी वांद्रे पूर्व येथील निर्मल नगर परिसरात तीन अज्ञातांनी गोळीबार केला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर लगेचच दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या कार्यालयाच्या बाहेरच त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबाराच्या घटनेच्या काही मिनिटे आधीच त्यांचे पुत्र आमदार झिशान सिद्दिकी हे त्यांना एक फोन आल्याने कार्यालयात गेले होते. तेवढ्यात हा गोळीबार झाल्याने ते या गोळीबारातून थोडक्यात बचावलेले आहे. अशी माहिती समोर आलेली आहे. विशेष म्हणजे ज्यांची हत्या झाली ते बाबा सिद्दिकी हे माजी राज्यमंत्री असून त्यांचे बॉलीवूड जगतात मोठे अधिराज्य आहे. त्यांना मुंबई पोलिसांकडून 8 पोलिसांची वाय दर्जाची पोलीस सुरक्षा व्यवस्था पुरण्यात आल्याचं बोललं जातंय. मात्र प्रत्यक्षात तीन पोलिसांची सुरक्षा असताना घटनास्थळी एकच पोलीस काँन्स्टेबल उपस्थित होता. अशी माहिती समोर आली आहे.याठिकाणी पोलीस सुरक्षा व्यवस्था कुचकामी ठरलेली आहे. त्यामुळे गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा एन्काऊंटर होऊ शकला नसल्याची माहिती समोर आलेली आहे.
यामुळे ऐन विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडाली आहे. या हत्येचे धागेदोरे गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई याच्याशी जोडले जात आहे. तो सध्या गुजरातच्या साबरमती जेलमध्ये असून तिथूनच तो आपल्या गॅंगची सूत्रे चालवत असल्याचे बोलले जात आहे.त्या दृष्टीने आता मुंबई क्राइम ब्रांचच्या पोलिसांचा तपास सुरू आहे.
बाबा सिद्दीकींच्या बुलेटप्रुफ गाडीवर गोळीबार
बाबा सिद्दिकी त्यांच्या बुलेटप्रुफ गाडीत बसल्यानंतर तिच्या काच उघड्याच होत्या. ते कार्यालयाबाहेर गाडीच्या दिशेने पडताच हल्लेखोर धावत आले आणि त्यांनी सिद्दीकी यांच्यावर अंदाधुंद गोळ्या झाडल्या. ते काही सेकंद आधीच गाडीत काच बंद करून बसले असते तर बुलेटप्रुफ काचेमुळे वाचू शकले असते. त्यांना तीन गोळ्या लागल्या, त्यापैकी एक गोळी छातीत लागली. गोळीबारानंतर लगेचच अंधेरी पूर्व येथून दोन आरोपींना रात्रीच ताब्यात घेण्यात आले असून गुन्हे शाखेकडून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दोन आरोपींची ओळख पटली
पोलिस सूत्रांनी सांगितले की, 1 आरोपी हरियाणाचा तर 1 आरोपी उत्तर प्रदेशचा आहे. मात्र, अद्याप 1 आरोपी संशयित फरार आहे. या हत्येसाठी अन्य राज्यातील शूटरला कंत्राट देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत मुंबईतील वांद्रे परिसरात प्रॉपर्टी डीलिंगच्या वादातून हे हत्याकांड झाल्याची चर्चा सुरू झालेली आहे. तसेच या हत्याकांडाचे धागेदोरे अंडरवर्ल्ड कनेक्शनशी जोडलेले आहेत का ? याही दृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे.
9.9MM च्या पिस्टलने गोळीबार
या हत्याकांडात आरोपींनी वापरलेले 9.9 चे पिस्टल हे मेड इन चायना आणि जर्मनी निर्मित असून ते मोठ्या आंतरराष्ट्रीय शस्त्र तस्करांच्या माध्यमातून मुंबईत आणले गेल्याचे बोलले जात आहे. या पिस्टलमधून एकाच वेळी 13 ते 15 गोळ्या झाडल्या जातात.