Advertisement
क्राईम/कोर्टजळगावमहाराष्ट्र

जळगाव शहरातील कासमवाडी खुनातील मुख्य आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने काही तासांत जेरबंद

जळगाव, दि. ३ ऑक्टोबर २०२५ : जळगाव शहरातील कासमवाडी परिसरात घडलेल्या खुनाच्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने केवळ काही तासांतच मुख्य आरोपीला अटक करून मोठे यश मिळवले आहे.
एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक ३ ऑक्टोबर २०२५ रोजी दाखल झालेल्या सीसीटीएनएस गुन्हा क्रमांक ७०६/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम १०३ अंतर्गत नोंदविण्यात आलेल्या या गंभीर खुनाच्या प्रकरणाचा तपास जळगावचे पोलीस अधीक्षक मा. डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने सुरू करण्यात आला. त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक (स्थानीय गुन्हे शाखा) मा. श्री. राहुल गायकवाड यांना आरोपीचा तातडीने शोध घेण्याचे आदेश दिले होते.
या आदेशानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोह/नितीन बाविस्कर, पोना/किशोर पाटील, पोक/छगन तायडे व पोकों/रविंद्र कापडणे या अधिकाऱ्यांचा विशेष पथक तयार करण्यात आला. खात्रीशीर गुप्त माहितीच्या आधारे या पथकाने नशिराबाद परिसरात सापळा रचला आणि अवघ्या काही तासांत मुख्य आरोपी योगेश संतोष पाटील उर्फ पिंटु (वय २७, रा. कासमवाडी, जळगाव) याला शिताफीने ताब्यात घेतले.
आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. संपूर्ण कारवाई जळगावचे पोलीस अधीक्षक मा. डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक मा. अशोक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी मा. नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या जलद आणि शिताफीदार कारवाईमुळे पुन्हा एकदा स्थानिक गुन्हे शाखेच्या दक्षता व तत्परतेची प्रचिती आली आहे. तथापि, जळगाव शहरात गेल्या काही महिन्यांपासून किरकोळ कारणावरून तसेच पूर्व वैमनस्यातून खुनांच्या गुन्ह्यांत सातत्याने वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Related Articles

Back to top button