बेताल वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडेंना अखेर दणका; अमरावतीतील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अमरावतीदि:29 महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त आणि हीन दर्जाचे वक्तव्य करणाऱ्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांच्यावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.महात्मा गांधींजींबद्दल भिडे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर विधिमंडळासह राज्यभरातील विविध ठिकाणी आंदोलन करत संभाजी भिडे यांच्यावर कारवाईची मागणी होत होती. आता अखेर राजापेठ पोलिसांनी प्रक्षोभक भाषण करणे कलम 153 अंतर्गत भिडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
संभाजी भिडे हा अनेकदा आपल्या बेताल वक्तव्य करून वाद ओढावून घेत असतो. बडनेरा मार्गावरील जय भारत मंगल कार्यालयात भिडे यांचे गुरुवारी रात्री व्याख्यान होते. यावेळी त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व करणाऱ्या महात्मा गांधी यांच्याबद्दलच आक्षेपार्ह वक्तव्य केलं. गांधी यांचे वडील मुसलमान होते, असा अजब दावा त्यांनी केला. महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांवर भिडेंवर कठोर कारवाईची मागणी सर्वच स्तरातून केली जात होती.
संभाजी भिडे ला देशातून हद्दपार करा -यशोमती ठाकूर
भिडेंच्या वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक झाली असून पुणे, आमरावती आणि कोल्हापूरात आंदोलने केली जात आहेत. तर काँग्रेस नेत्या ॲड. आमदार यशोमती ठाकूर यांनी भिडे यांच्यावर टीकेची झोड उढवली आहे. तसेच भिडे यांना महाराष्ट्रातूनच नाही तर देशातून हद्दपार केलं पाहिजे असं म्हटलं आहे. तर आज यवतमाळमध्ये संभाजी भिडेचे व्याख्यान आयोजित केलं आहे. मात्र त्याच्याआधी भिडेच्या दौऱ्याला आंबेडकरवादी संघटनांनी आक्रमक भमिका घेत विरोध केला आहे. तर वंचित आणि जनआक्रोश मार्चाकडून भिडे यांचं हे व्याख्यान उधळून टाकण्याचा इशारा दिला आहे. तर या वादावरून भिडे यांना पोलिस संरक्षण देण्यात आलं आहे. तर सभेस्थळी पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.