Advertisement नंदग्राम गोधाम वाटरपार्क,अंजाळे
आंतरराष्ट्रीयक्राईम/कोर्टमुंबईराजकीयराष्ट्रीयसंपादकीय

भारत-पाक युद्धविराम !! मात्र कुत्र्याची शेपटी ही वाकडीच असते ! लबाड पाक शस्त्रसंधीच पालन किती दिवस करेल ?

एखाद्या अण्वस्त्रधारी देशाच्या हवाई तळांवर हल्ले होण्याची जगातील पहिली घटना

मुंबई दि-१०/०५/२५, 22 एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर 26 जणांचा बळी गेला होता त्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर भारत सरकारने सर्वपक्षीय बैठका घेऊन तसेच वरीष्ठ लष्करी अधिकारी यांच्याशी चर्चा विनिमय करून पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी  आणि पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यासाठी मोठी योजना असलेली होती. त्या अनुषंगाने भारतीय लष्कराला त्यांच्या रणनीतीनुसार पाकिस्तानात ड्रोनहल्ले करण्यासाठी खुली सूट देण्यात आलेली होती. त्यानुसार गेल्या तीन दिवसांपासून पाकिस्तानातील दहशतवादी प्रशिक्षण केंद्रे आणि लष्करी हवाई तळांवर भारतीय सैन्याकडून अचूक ड्रोन हल्ले करण्यात येऊन शंभरच्या वर दहशतवादी ठार करण्यात आलेले होते. यात अनेक मोस्ट वांटेड दहशतवाद्यांचा देखील समावेश आहे. तसेच त्यांचे दहशतवादी प्रशिक्षण केंद्रे देखील उध्वस्त करण्यात येऊन सोबतच 15 च्या जवळपास पाकिस्तानी हवाई दलाचे तळ उद्ध्वस्त करण्यात आलेले आहे. भारताने एलओसी न ओलांडता पाकिस्तानात केलेल्या जबरदस्त आणि अचूक आक्रमक ड्रोन हल्ल्यांपुढे पाकिस्तानात मोठी खळबळ उडालेली असून त्यांचे प्रचंड नुकसान झाल्याचे दिसून आलेले आहे. तसेच पाकिस्तानची हवाई सुरक्षा यंत्रणा देखील कुचकामी असल्याचे आता अधोरेखित झालेले आहेत. भारताने केलेल्या हल्ल्यांच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानकडून भारतातील विविध भागात झालेल्या ड्रोन व क्षेपणास्त्र हल्ल्यांना भारताच्या S-400 या हवाई सुरक्षा यंत्रणेने अचूक भेदून ते ड्रोन हवेतच नष्ट करून भारताला सुरक्षित केलेले आहे. मात्र पाकिस्तानला हे युद्ध परवडणारे नसल्याचे लक्षात येतात पाकिस्तानी नेत्यांनी अमेरिकेपुढे लोटांगण घालत भारताला शस्त्रसंधी करण्यासाठी विनंती केली होती. त्यानुसार काल रात्रीपासूनच अमेरीकेने पाकिस्तान आणि भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाशी फोनवरून चर्चा केलेली होती. त्यानुसार आज सायंकाळी सहा वाजता परराष्ट्र मंत्रालय आणि लष्करी अधिकाऱ्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सायंकाळी पाच वाजेपासून भारत आणि पाकिस्तान मध्ये शस्त्रसंधी झाल्याचे जाहीर करण्यात आलेले आहे. तसेच परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी भारत- पाकिस्तान मध्ये झालेली शस्त्रसंधी ही भारताच्या अटी शर्ती नुसार झालेली असल्याचे ठामपणे सांगितलेले आहे. मात्र मुंबईवरील 26/11 चा दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर झालेले अनेक दहशतवादी हल्ले यांचे पुरावे देऊनही कारवाई न करणाऱ्या पाकिस्तानचा पूर्व इतिहास बघता पाकिस्तान किती दिवस या शस्त्रसंधीचे काटेकोरपणे पालन करतो, याकडे भारताचे लक्ष लागू आहे. खरं तर पाकिस्तान मध्ये आजपर्यंतचा इतिहास बघता लष्करापुढे आणि आयएसआयपुढे तेथील राज्यकर्ते हे केवळ नामधारी असतात. त्यामुळे खरी सत्ताही लष्कराकडेच असते. आजपर्यंत वेळोवेळी झालेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाचा इतिहास पाहता ही शस्त्रसंधी जास्त काळ टिकणार का ? याबाबत निवृत्त वरीष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी विविध टीव्ही चॅनलवर झालेल्या चर्चेत मतमतांतरे दाखविलेले आहे. शेवटी कुत्र्याची शेपूट ही वाकडीच असते, हे आजपर्यंत तरी सिद्ध झाल्याचा इतिहास आहे. मात्र भारत-पाक मध्ये झालेल्या या शस्त्रसंधीमुळे भारताला नेमका काय फायदा झाला ?  याची उत्तरे आता सरकारकडून लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. मात्र पुन्हा एकदा पाकिस्तान कडून सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन झाल्यास भारत पुन्हा एकदा पाकला अचूक ड्रोन हल्ल्यांद्वारे सडेतोड उत्तर देण्यास तयार असल्याचे ,आता पाकिस्तानच्या लक्षात आलेले आहेत.
बलुचिस्तान आणि PoK चर्चेत
भारत पाक मध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर ज्या प्रकारे मध्यरात्री अत्यंत आक्रमकपणे भारताकडून पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर आणि हवाई तळांवर ड्रोनहल्ले करण्यात येत होते, ते बघून बलुचिस्तानातील जनतेमध्ये प्रचंड आनंद व्यक्त करण्यात येत होता. त्यांना स्वातंत्र्याचे वेध लागलअसूनअसून भारत त्यांना यासाठी मदत करेल ,अशी त्यांना प्रचंड आशा लागलेली आहे. तर दुसरीकडे भारताकडून 1947 साली धोकेबाज पद्धतीने बेकायदेशीर कब्जा केलेले पाकिस्तान व्याप काश्मीर पुन्हा एकदा भारतात सामील करण्यासाठी हीच वेळ योग्य असल्याची भावना देशातील नागरिकांमध्ये आता निर्माण झालेली आहे. भारत सरकारने 2019 मध्ये काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर तेथील विकासासाठी तब्बल 12000 कोटींचा निधी राखीव ठेवण्यात आलेला आहे. मात्र आता शस्त्रसंधी झाल्याने PoK साठी आता अजून किती काळ वाट बघावी लागेल , हे पाकिस्तानकडून होणाऱ्या दहशतवादी कृत्यावर अवलंबून आहे.  PoK ला भारतात सामील करण्यास आता जास्त काळ लागणार नसल्याचे स्पष्ट संकेत सध्याच्या मोदी सरकारच्या राजकीय इच्छाशक्ती वरून स्पष्ट झालेले आहे.
अणुशक्तीसज्ज देशाचे एअरबेस प्रथमच उडवले
जगातील केवळ नऊ देशांकडे अण्वस्त्रे असून त्यात भारत आणि पाकिस्तानचा समावेश होतो. जगाच्या इतिहासातील युद्धांचा इतिहास बघता आजपर्यंत आण्विक शक्ती असलेल्या जगातील कोणत्याही देशाच्या हवाई तळांवर कोणत्याही देशाने आजपर्यंत लष्करी कारवाई किंवा हल्ले केलेले नव्हते. भारताने पाकिस्तानच्या तब्बल 18 पेक्षा अधिक हवाई तळांवर जोरदार आणी अचूक ड्रोन हल्ले केलेले , त्यामुळे त्यांच्या हवाई पट्टीचे आणि विमानतळांचे प्रचंड नुकसान झाल्याचे समोर आलेले आहे. भारताच्या या अनपेक्षित आणि आक्रमक हल्ल्यांमुळे पाकिस्तान पूर्णपणे बिथरलेला असून त्यांच्या कुचकामी हवाई सुरक्षा यंत्रणा यामुळे त्यांची लष्करी शक्ती किती कमकुवत आहे,  हे आता समोर आलेले आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button