Advertisement
अर्थकारणजळगावमहाराष्ट्रमुंबई

भुसावळ तालुक्यातील संजय गांधी योजनेच्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी तहसीलदार कार्यालयाची महत्वाची व तातडीची सूचना

भुसावळ: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई, महाराष्ट्र शासन यांच्या आदेशानुसार अन्वये, तहसीलदार कार्यालय भुसावळ यांच्या वतीने संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेअंतर्गत लाभ मिळणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांना महत्वाचे आणि तातडीचे आवाहन करण्यात येत आहे.
ज्या लाभार्थ्यांचे या योजनांतर्गत लाभ मंजूर झाले असून सध्या सुरू आहेत, अशांनी खालील कागदपत्रांसह भुसावळ तहसीलदार कार्यालयात दिनांक १३/१०/२५ ते १५/१०/२५ पर्यंत खालील कागदपत्रांसह तपासणीसाठी उपस्थित राहावे.
१)मूळ दिव्यांग प्रमाणपत्र
२)UDID कार्ड
३)आधार कार्ड
४)योजनेचा शिक्का असलेले बँक पासबुक
५)वरील सर्व कागदपत्रांचा एक झेरॉक्स सेट (त्यावर मोबाईल क्रमांक नमूद करावा )
सर्व लाभार्थ्यांनी वरील कालावधीत कागदपत्रांसह तात्काळ उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार कार्यालय, भुसावळ यांनी केले आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Related Articles

Back to top button