Advertisement
जळगावनिवडणूकमहाराष्ट्रमुंबईराजकीय

मतदारांनो तुमचा प्रभाग बदल झालाय ? यादीतून तुमचे नाव गायब झाले आहे का ? असे करा चेक…

जळगाव,दि. १२ ऑक्टोबर २०२५ : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रारूप मतदार यादी ८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या मतदार यादीतील नावे https://mahasecvoterlist.in/ या संकेतस्थळावर तपासता येऊ शकतात. मतदारांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ नये , तसेच त्यांचा मतदानाचा हक्क डावलला जाऊ नये, आणि त्यांना त्यांचा प्रभाग क्रमांक सुनिश्चित करण्यासाठी निवडणूक आयोगाने वेबसाईटची माहिती प्रकाशित केलेली असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केलेले आहे. यासाठी मतदारांचे मतदान कार्ड सोबत ठेवून, खालील लिंक वर क्लिक करून आपली नगरपरिषद/ नगरपंचायत निवडून त्यावर मतदान कार्ड वरील EPIC नंबर टाकायचा आहे.
राज्य निवडणूक आयोगाने १ जुलै २०२५ हा अधिसूचित दिनांक निश्चित केला असून, त्या दिवशीच्या विधानसभेच्या मतदार यादीवर आधारित ही यादी तयार करण्यात आली आहे. मतदार आपले नाव, प्रभाग बदल किंवा यादीतील त्रुटी https://mahasec.maharashtra.gov.in/ वर उपलब्ध लिंकद्वारे किंवा https://mahasecvoterlist.in/ObjectionOnClick/DownloadVoterlist येथे विनाछायाचित्राची पीडीएफ प्रत डाउनलोड करून तपासू शकतात.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रारूप मतदार यादीची छायांकित प्रत तहसील कार्यालयात, तर नगरपरिषद/नगरपंचायतींची यादी संबंधित कार्यालयात उपलब्ध आहे. यादीच्या प्रति घेण्यासाठी प्रति पृष्ठ दोन रुपये शुल्क आकारले जाईल.
मतदारांना आपले नाव तपासण्याचे आणि त्रुटी असल्यास दुरुस्तीसाठी त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने केले आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Related Articles

Back to top button