Advertisement
राजकीय

भुसावळ नगरपरिषदेच्या तहकूब सभांवरून वाद; जिल्हाधिकारी यांनी बजावली नोटीस, २४ मार्चला नगराध्यक्षांसह २५ नगरसेवकांची सुनावणी

जळगाव, १८/०३/२०२६ : भुसावळ नगरपरिषदेच्या सर्व साधारण सभा वारंवार तहकूब (अस्थगित) करण्यात आल्याबाबत केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ च्या कलम ३०८ अंतर्गत दाखल अपीलाची सुनावणी जिल्हाधिकारी जळगाव यांच्या न्यायालयात २४ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता घेण्यात येणार आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालय (नगरविकास शाखा) यांनी भुसावळ नगरपरिषदेच्या २५ नगरसेवकांना (वादी) नोटीस बजावली असून, त्यांना वैयक्तिक किंवा वकिलामार्फत उपस्थित राहून आपले म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. उपस्थित न राहिल्यास ‘आपले काही एक सांगणे नाही’ असे गृहीत धरून निर्णय घेण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.


नोटीसच्या मुख्य बाबी अशा :
जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव यांनी बजावलेल्या नोटीसमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, जिल्हाधिकारी यांनी २४ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता सुनावणी आयोजित केली आहे. वादी म्हणून खालील भाजपच्या २५ नगरसेवकांना नोटीस बजावण्यात आली आहे :
१) श्री. युवराज दगडू लोणारी (गटनेता)
२) सौ. शैलजा पुरुषोत्तम नारखेडे (उपनगराध्यक्षा)
३) सौ. पूजा प्रेमचंद तायडे
४) श्री. गिरीष सुरेश महाजन
५) सौ. प्राची उदय पाटील
६) सौ. अर्चना विलास सातदिवे
७) श्री. आशिष ईश्वरलाल पटेल
८) सौ. शोभा रणधीर इंगळे
९) श्री. परिक्षीत मुंडलीक ब-हाटे
१०) श्री. विशाल राजेंद्र नाटकर
११) सौ. प्रिती मुकेश पाटील
१२) सौ. अनिता सतीष सपकाळे
१३) श्रीमती. पुनम वसंत पाटील
१४) श्रीमती. सोनी संतोष बारसे
१५) सौ. प्रिया बोधराज चौधरी
१६) सौ. मेघा देवेंद्र वाणी
१७) श्री. राजेंद्र दत्तू आवटे
१८) सौ. सिमा प्रशांत नरवाडे
१९) श्री. निर्मल रमेश कोठारी
२०) श्री. महेंद्रसिंग हनुमानसिंग ठाकुर
२१) श्री. प्रकाश रमेश बतरा
२२) श्री. किरण भागवत कोलते
२३) सौ. आशा कैलास पाटील
२४) सौ. सोनल रमाकांत महाजन
२५) श्रीमती. डॉ. छाया मुरलीधर फालक (देशमुख)
तर सभा तहकूब केल्याप्रकरणी प्रतिवादी म्हणून :
१) नगराध्यक्षा, नगरपरिषद भुसावळ
२) मुख्याधिकारी, नगरपरिषद भुसावळ
यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण ?
भुसावळ नगरपरिषदेच्या सर्व साधारण सभा (जनरल बॉडी मीटिंग्स) वारंवार तहकूब करण्यात आल्याबाबत भाजपच्या या २५ नगरसेवकांनी तक्रार/अपील दाखल केले आहे. महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियमाच्या कलम ३०८ नुसार जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील दाखल करण्याचा अधिकार आहे. या अपीलामुळे संपूर्ण प्रकरण आता जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात आले असून, दोन्ही पक्षांना कागदपत्रांसह उपस्थित राहावे लागणार आहे.


जनार्दन पंढरीनाथ पवार, सह आयुक्त, नगरविकास शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव यांच्याकडून जिल्हाधिकारी यांच्या मंजूर टिपणीनुसार ही नोटीस काढण्यात आली आहे.
मुख्याधिकाऱ्यांना सूचना :
नोटीसीची प्रत मुख्याधिकारी
, नगरपरिषद भुसावळ यांना पाठवण्यात आली असून, त्यांना अर्जदार व सामनेवाल्यांच्या प्रती तात्काळ बजावून, त्यावर दिनांकित स्वाक्षरी घेऊन पोहोच विना विलंब ई-मेलद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
पुढील परिणाम काय ?
ही सुनावणी भुसावळ नगरपरिषदेच्या प्रशासकीय आणि राजकीय वातावरणात मोठी खळबळ निर्माण करणारी राहणार असण्याची शक्यता आहे. कारण सभा वारंवार तहकूब होण्याची सबळ आणि समाधानकारक कारणांचा खुलासा नगराध्यक्षा सौ गायत्री भंगाळे आणि मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांनी जिल्हाधिकारी यांना सुनावणीच्या वेळी स्वतः किंवा त्यांच्या वकिलामार्फत सादर करावा लागणार आहे. भाजपच्या नगरसेवकांच्या तक्रारीनुसार सभा विनाकारण तहकूब होत असल्याने भुसावळ शहरातील विकासकामे, बजेट मंजुरी, धोरणे यावर परिणाम होत असल्याचे समजते. २४ मार्चला दोन्ही पक्ष सुनावणीसाठी उपस्थित राहिले नाहीत तर जिल्हाधिकारी एकतर्फी निर्णय घेऊ शकतात. सध्या भुसावळ नगरपरिषदेत सत्तासंघर्ष, विरोधकांच्या तक्रारी व प्रशासकीय अडचणी यामुळे सर्वसाधारण सभा घेणे कठीण झाल्याचे काल तहकूब झालेल्या सभेवरून दिसून येत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या या नोटीसीमुळे आता भुसावळ नगरपरिषदेच्या तहकूब सभांचा मुद्दा आता जिल्हा न्यायदंडाधिकारी पातळीवर सोडवला जाणार आहे. या सुनावणीनंतर काय निर्णय होतो, याकडे भुसावळ शहरातील नागरिकांचे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -9820203031

Related Articles

Back to top button