भुसावळ निवडणूक: प्रिती मुकेश पाटील प्रभाग क्रमांक 7 ‘अ ‘ मधून बिनविरोध, मुकेश पाटील यांची माहिती

भुसावळ – भुसावळ नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीत प्रभाग क्रमांक 7 ‘अ’ मधून महिला राखीव गटातून प्रिती मुकेश पाटील या बिनविरोध निवडून आल्याने भुसावळ शहरातील राजकारणात खळबळ उडालेली आहे. आज नामनिर्देशन पत्र छाननीच्या दिवशीच हा ऐतिहासिक विजय मिळवल्याने भारतीय जनता पक्षाचे मनोबल वाढलेले आहे.
दरम्यान , प्रीती मुकेश पाटील यांच्या विरोधात सारिका युवराज पाटिल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने दिलेल्या AB Form मध्ये तांत्रिक चुका व त्रुटी आढळून आल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी, जितेंद्र पाटील यांनी तो अर्ज बाद ठरविल्याची माहिती मुकेश नरेंद्र पाटील यांनी दिलेली असून आणि विरोधात इतर कोणीही अपक्ष उमेदवार शिल्लक नसल्याने भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार प्रिती मुकेश पाटील या बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने उमेदवारांना AB Form देताना केलेल्या चुकांमुळे निवडणूक लढविण्यासाठी केलेली तयारी वाया जात असल्याने उमेदवारांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे.












