भुसावळ: प्रभाग २१-अ मध्ये रोशनी कैलास शेलोडे यांच्या अपक्ष उमेदवारीचे तगडे आव्हान,प्रचाराला मतदारांचा प्रचंड प्रतिसाद
प्रस्थापितांना धक्का देणारं असल्याची चर्चा

भुसावळ : भुसावळ नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना प्रभाग क्रमांक २१-अ मधून अपक्ष उमेदवार म्हणून रोशनी कैलास शेलोडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मतदानाची तारीख जवळ येत असतानाच त्यांच्या प्रचाराने प्रभागात प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
उच्चशिक्षित, संयमी, सुसंस्कृत आणि विश्वासू अशी ओळख असलेल्या तरुण उमेदवार रोशनी शेलोडे यांनी “ना जाती, ना पातीसाठी… माझी उमेदवारी फक्त आणि फक्त प्रभागाच्या विकासासाठी” असे ठाम ध्येय घेऊन मैदानात उतरल्या आहेत. त्यांच्या प्रचार मिरवणुकीला प्रभागातील महिला-पुरुष मतदारांचा स्वयंस्फूर्तीने उदंड प्रतिसाद मिळत आहे. घराघरात महिलांनी औक्षण करून त्यांचे जोरदार स्वागत केले जात आहे.
प्रचारादरम्यान रोशनी शेलोडे या प्रत्येक गल्लीत, प्रत्येक घरात जाऊन मतदारांच्या समस्या जाणून घेत आहेत आणि पाणी, रस्ते, स्वच्छता, ड्रेनेज, स्ट्रीट लाईट अशा प्रलंबित प्रश्नांना प्राधान्य देऊन प्रभागाचा कायापालट करण्याचे ठोस आश्वासन देत आहेत. त्यांच्या या दमदार प्रचारामुळे प्रभागात नवचैतन्य निर्माण झाले असून मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड विश्वासाची भावना दिसून येत आहे.
प्रचार मिरवणुकीत प्रभागातील शेकडो नागरिक, महिला व युवक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यांना पाठिंबा देणाऱ्यांमध्ये रमेश ठाकरे, गोपाळ बाविस्कर, नरेंद्र वाघ, कैलास शेलोडे, बिसेन बाविस्कर, गजानन सपकाळे, अनिकेत वाघ, अश्विन शेलोडे, मिलिंद धबडकर, हितेश चव्हाण, ओम धनगर, साई अवतारी, निशांत वरूळकर, जयेश पाटील यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्ते उत्साहाने सहभाग घेत आहेत. या सर्वांच्या अनमोल सहकार्यामुळे प्रचाराला अधिकच बळ मिळाले आहे.
“प्रभागातील जनता बदल हवी आहे असं म्हणते आणि मी त्याच बदलाची वाहक आहे,” असे सांगत रोशनी शेलोडे यांनी आपल्या विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. प्रभाग २१-अ मधील ही लढत आता अत्यंत रंगतदार झाली असून रोशनी शेलोडे यांच्या तरूण तडफदार उमेदवाराच्या रूपाने विकासाची नवी आशा निर्माण झाल्याचे मतदारांमधून व्यक्त होत आहे.












