माजी खासदार डॉ उल्हास पाटील यांना मोठा झटका,व्हायरल झालेल्या पत्राने मोठी खळबळ
जळगाव दि-22 , जळगाव जिल्ह्यातील राजकारणात खळबळ उडवून देणारी एक खूप मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आलेली असून जळगाव काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांना 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे. डॉ. उल्हास पाटील त्यांच्या पत्नी डॉक्टर वर्षा पाटील या दोघांसह काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्यावर काँग्रेस तर्फे निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वतीने उल्हास पाटील यांच्यासह तिघांना निलंबनाचे पत्र देण्यात आले आहे. एकाचवेळी काँग्रेसमधील तिघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
नाना पटोले यांच्या या कारवाईनंतर डॉ. उल्हास पाटील , वर्षा पाटील तसेच त्यांच्या कन्या केतकी पाटील तिघे कुटुंबीय हे भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना जोरदार उधाण आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून उल्हास पाटील व पत्नी वर्षा पाटील यांच्या कन्या केतकी पाटील यांच्या हालचाली संशयास्पद व भाजपात असल्यास सदृष्य वाटल्याने हे डॉ कुटुंब 2 दिवसांत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिलेली आहे.
आदेशाच पत्र सोशल मीडियावर व्हायरल
काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष तथा माजी खासदार उल्हास पाटील यांच्यासह त्यांच्या पत्नी डॉक्टर वर्षा पाटील आणि युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे या तिघांवर काँग्रेस पक्षातर्फे निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वतीने तिघांनाही काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आल्याचे पत्रात म्हटलेलं आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे संघटना प्रशासन उपाध्यक्ष नाना गावंडे यांच्या स्वाक्षरीचे पत्र तिघांनाही देण्यात आला आहे. हे पत्र सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालंय.आता उल्हास पाटील या संदर्भात काय प्रतिक्रिया देतात याकडे जळगाव जिल्ह्यातील राजकीय नेत्यांचे लक्ष लागून आहे.