आंतरराष्ट्रीयमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रीयसंपादकीय
Trending

इराणची पुन्हा पाकिस्तानला धमकी ! इराणी कर्नलच्या हत्येचा बदला घेणार ? पाकिस्तानात पुन्हा खळबळ

पाकिस्तानात हाय अलर्ट

तेहरान (वृत्तसंस्था) दि-20 – #Iranpakistanconflict , इराणने मंगळवारी मध्यरात्री  पाकिस्तानातील जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या 50 किमी आतच्या चौक्यांवर क्षेपणास्त्र हल्ला केल्यापासून पाकिस्तानात खळबळ उडालेली होती. त्यानंतर पाकिस्ताननेही दबावाखाली येऊन इराणमधील 50 किमी आतमधील भागात कथित दहशतवादी गटांवर ड्रोन हल्ले करून इराणच्या हल्ल्याला तोडीसतोड प्रत्युत्तर दिले होते.तसेच इराण व पाकिस्तानातील तणाव यापुढे न वाढण्यासाठी सुद्धा पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाकडून प्रसिद्धी पत्रक जाहीर करण्यात आले होते. अशातच त्याच दिवशी तणाव वाढत असलेल्या इराणच्या सीमाभागातील पाकिस्तान सीमेजवळ काही अज्ञात सशस्त्र दहशतवाद्यांनी एका सैन्याच्या कारवर गोळीबार केल्यानंतर इराणच्या रिव्हाल्युशनरी गार्डचा (IRGC) कर्नल होसेन-अली जावदानफर ठार झालेला आहे. IRGC ग्राउंड फोर्सच्या कुड्स बेसने जावदनफरची हत्या झाल्याची माहिती देणारे निवेदन जारी केले असून त्यातून म्हटलंय की तो सरवन काउंटीमधील सांस्कृतिक उपक्रम आणि प्रकल्पांशी संबंधित मोहिमेवर तैनात होता. त्याच्या ठार झाल्याच्या खुलाशानंतर पाकिस्तानातील जैश अल-अदल सुन्नी या दहशतवादी गटाने त्याच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली असून त्या कर्नलसमवेत आणखी दोन अंगरक्षक देखील मारले गेल्याची घोषणा केली आहे.
IRGC ने पाकिस्तानमध्ये सुन्नी दहशतवादी गटावर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला केल्याच्या दुसऱ्याच दिवशी ही घटना घडलेली आहे.
विशेष म्हणजे पाकिस्तानने इराणमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात पाकिस्तानचेच नऊ घुसखोर नागरिक ठार झाल्याची माहिती इराणी दिलेली आहे.
प्रत्युत्तरात,पाकिस्तानने इराणने केलेला हल्ला “बेकायदेशीर” आणि “पूर्णपणे अस्वीकार्य” म्हणून निषेध केला आणि दोन मुलांच्या मृत्यूचा दावा केला होता.
  दरम्यान,जैश अल-अदलने इराणी कमांडरच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली केली आणि पाकिस्तानात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. तसेच इराणच्या समुद्रकिनारी भारत चाबहार बंदर विकसित करत असून यावर सुद्धा या दहशतवाद्यांनी यापूर्वी हल्ला केलेला आहे.
इराणची बदला घेण्याची धमकी
2012 मध्ये पाकिस्तानात स्थापित झालेला हा दहशतवादी गट प्रामुख्याने पाकिस्तान-इराण सीमेलगत कार्यरत आहे आणि इराणमध्ये त्या गटाने यापूर्वी हल्ले केलेले आहे. इराणने यापूर्वी या गटाशी इराणच्या सिस्थान-बलुचिस्तान सीमा संघर्षांचा सामना केलेला आहे. आता इराणच्या कर्नलची हत्या झाल्याने इराण संतापला असून त्याने या हत्येचा बदला घेण्याची घोषणा केल्याने पाकिस्तानात प्रचंड खळबळ उडालेली आहे. त्यामुळे इराण पाकिस्तानात पुन्हा एकदा हल्ला करतो की काय ? अशी भीती पाकिस्तानात व्यक्त करण्यात येत आहे.यामुळे इराण-पाकिस्तानात पुन्हा एकदा तणावात आणखी भर पडलेली असून यामुळे पाकिस्तानात हाय ॲलर्ट घोषित करण्यात आला आहे.तसेच मध्य आशिया व मध्यपूर्वेतील देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
अमेरिकेचे फूस आणि पाकिस्तानचा हल्ला
इराणने इराक व सिरियातील अमेरिकेच्या आर्थिक हितसंबंधीत ठिकाणांजवळ महिन्याभरापासून अनेकदा क्षेपणास्त्र हल्ले करून पश्चिम आशियात तणाव निर्माण केलेला आहे.तसेच लाल समुद्रात हौती विद्रोही दहशतवाद्यांनी अमेरिकेच्या व्यापारी जहाजांवर दुसऱ्यांदा हल्ला केला आहे.लाल समुद्रात अमेरीकी जहाजांवर या केलेल्या जात असलेल्या दहशतवादी हल्ल्यांना इराणने जाहीर पाठिंबा दिलेला आहे.त्यानंतर गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला कर्जाचा दुसरा हप्ता तात्काळ देऊ केला आहे.विशेष म्हणजे आयएमएफ वर अमेरिकेचे वर्चस्व असून गेल्या वर्षभरापासून कर्जासाठी तडफडत असलेल्या पाकिस्तानला तात्काळ मोठी आर्थिक मदत IMF कडून मिळालेली आहे. त्याच्या दुसऱ्याच दिवशी सौदी अरेबियानेही पाकिस्तानला तात्काळ आर्थिक मदत देऊ केलेली आहे. या सर्व घडामोडी गेल्या आठवड्यात अत्यंत जलदगतीने घडलेल्या असून नक्कीच यामागे इराणचा पाकिस्तानच्या माध्यमातून काटा काढून इस्राएल हमास युद्ध व हौती विद्रोहींना मिळणारी अप्रत्यक्ष मदत यावरून इराणचे लक्ष्य वळविण्यात अमेरीका यशस्वी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र आता इराणने त्यांच्या कर्नलच्या हत्येचा बदला घेण्याची जाहीर धमकी दिल्याने मध्य आशियात पुन्हा एकदा तणाव निर्माण झालेला आहे.
इराणने पाकिस्तानात केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर पाकिस्तानने इराणच्या राजदूतांना माघारी पाठवलं होतं. तसेच पाकिस्तानच्या राजदूतांना परत माघारी पाठवले होते. आता इराण त्यांच्या कर्नलच्या हत्येचा बदला कस घेतो ? यावरून जगभरात विविध चर्चांना उधाण आलेले आहे. तसेच या सर्व घटनांवर संयुक्त राष्ट्र, चीन, अमेरिकेसह भारताची करडी नजर आहे. अफगाणिस्तानातील तालिबान सरकारने दहशतवाद्यांच्या मुद्द्यावर पाकिस्तान व इराणला चर्चेतून मार्ग काढण्याचा फुकटचा सल्ला दिलेला आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button