क्राईम/कोर्टजळगावमुंबई

वरणगाव आयुध निर्माणीतील चोरी झालेल्या 2 रायफल्ससह एकास अटक, एटिएसची मोठी कारवाई

जळगाव,दि-04/11/2024 । भुसावळ तालुक्यातील वरणगाव आयुध निर्माणीच्या शस्त्रागारातुन दिनांक-19/10/24 ते दि-21/10/24 दरम्यान अज्ञात चोरट्यांनी सील व कुलूप व कडीकोयंडा तोडून शस्त्रागारातील तीन AK 47 रायफल्स व दोन गलील अशा 5 अत्याधुनिक रायफल्स चोरून नेल्या होत्या. यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडालेली होती. वरणगाव आयुध निर्माणीतील कडेकोट सुरक्षा व्यवस्थेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं होते. याप्रकरणी भुसावळ तालुक्यातील वरणगाव पोलीस स्टेशन येथे विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. जळगाव जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री अशोक नखाते हे देखील या गंभीर घटनेची दखल घेऊन चौकशी करण्यासाठी काही दिवस तळ ठोकून होते. तसेच राज्याचे दहशतवादविरोधी पथक, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांचे नेतृत्वाखालील गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रभारी अधिकारी व विविध तपास यंत्रणा देखील सतर्क झालेले होत्या. व समन्वयातून या चोरीच्या घटनेचा तपास सुरू करण्यात आलेला होता. काही दिवसांपूर्वी भुसावळ तालुक्यातील जाडगाव रेल्वे ट्रॅकवर तीन AK 47 रायफल्स मिळून आलेल्या होत्या. त्यानंतर तपासाची चक्र वेगाने फिरवत रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या कुंडल्या काढून काल एकाला दोन रायफल्ससह अटक करण्यात आलेली आहे.
दरम्यान,पोलीस रेकॉर्डवरील आरोपींची माहिती काढून एटीएसच्या पथकाने गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवुन, गुन्हा प्रकटीकरणाचे कौशल्य वापरून यातील आरोपी लिलाधर उर्फ निलेश बळीराम थाटे, (वय 43) रा.तळवेल ता. भुसावळ जि. जळगांव याचेकडे कसून चौकशी केली असता सदर आरोपीने गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. तसेच आयुध निर्माणी वरणगांव येथून चोरी केलेल्या AK 47 रायफल्स व गलील रायफल्स त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या आहेत. यापूर्वी बेवारस स्थितीत जाडगाव रेल्वे रूळावर आढळून आलेल्या 3 रायफली ह्या देखील त्यानेच रेल्वे रूळावर टाकल्याचे कबूल केलेले आहे. गुन्ह्यातील आरोपी व गुन्ह्यात वापरलेली मोटर सायकल तसेच गुन्ह्यात वापरलेला मोबाईल हे सहा.पोलीस निरीक्षक, वरणगांव पोलीस स्टेशन यांचेकडेस जमा केले असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास जळगांव जिल्हा पोलीस करीत आहेत.
       याप्रकरणी आयुध निर्माणीतील केंद्रीय सुरक्षा दलातील काही पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना देखील निलंबित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button