विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे धक्कादायक खुलासे,ना सुप्रीम कोर्टाची नोटीस आली,ना राष्ट्रवादीच्या आमदारांबाबतचे पत्र
राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोण यावरून आता नवा पेच
मुंबई दि:15- विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ‘इंडिया टुडे’ ला दिलेल्या मुलाखतीत धक्कादायक खुलासे केलेले असून यामध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना विभाजन झाल्याची अथवा फुट पडल्याचे कोणतेही पत्र अजून पर्यंत कोणत्याही अधिकृत पदाधिकाऱ्याकडून प्राप्त झाले नसल्याचे सांगितले. जी पूर्वीची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची माहिती व आमदारांचे संख्याबळ आहे,तेवढीच माहिती आमच्या विधानमंडळ सचिवालयात उपलब्ध आहे. त्याच्या व्यतिरिक्त कोणतेही नवीन पत्र आमच्या कार्यालयाकडे आलेले नसल्याचे राहुल नार्वेकर यांनी सांगितले.
सुप्रीम कोर्टाचे सूचनापत्र प्राप्त नाही
तसेच सर्वोच्च न्यायालयानेही आम्हाला 16 शिवसेना आमदारांच्या अपात्रते संदर्भातील प्रलंबित निर्णयासंदर्भात दोन आठवड्यात निर्णय घेण्याचे किंवा कारवाई करण्याचे कोणतेही सूचना पत्र विधानसभा अध्यक्ष म्हणून मला किंवा माझ्या कार्यालयात आज सकाळपर्यंत प्राप्त झालेले नसल्याचे राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले.
विधानसभा विपक्ष नेता बदलाबाबतही पत्र नाही
तसेच 17 जुलैपासून सुरू होणाऱ्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेता म्हणून एखाद्या पक्षाच्या नेत्याची निवड करण्यासंदर्भात सुद्धा माझ्याकडे कोणतेही पत्र कोणत्याही पक्षाच्या अध्यक्षांनी अजून पर्यंत दिलेले नाही. तसेच आमच्याकडे उपलब्ध असलेल्या पक्षीय संख्याबळानुसार आम्ही योग्य त्या पक्षाच्या नेत्याला आलेल्या प्रस्तावावरून कायदेशीर बाबींचा अभ्यास करून विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेऊ,अशी माहिती अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेली आहे. त्यामुळे सुरू असलेल्या वेगवेगळ्या चर्चांना आता विधानसभा अध्यक्ष यांनी स्पष्टोक्ती दिल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार व जयंत पाटील राष्ट्रवादीच्या आमदारांवरील कारवाई व अध्यक्षपदाची निवड यासंदर्भात पत्रव्यवहार केल्याच्या दाव्यांना आता वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे.