Advertisement
क्राईम/कोर्टजळगावमहाराष्ट्र

चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षकावर गंभीर आरोप,३ संशयितांना नग्न करून अश्लील चाळे करायला भाग लावले

जळगाव दि-२९/०७/२५, जिल्ह्यातील चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीच्या अपहरणाच्या संशयावरून ताब्यात घेतलेल्या तीन तरुणांना अमानुष मारहाण करून त्यांना एकमेकांशी लैंगिक चाळे करण्यास भाग पाडून  छळ केल्याचा अमानुष आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका अत्यंत गंभीर प्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ उडालेली असून यामुळे पोलिस दलाची प्रतिमा डागाळलेली आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सज्जनसिंह नार्हेडा यांना जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी तातडीने निलंबित केलेले आहे.
दरम्यान, चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात एका अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या संदर्भात, पोलीस उपनिरीक्षक सज्जनसिंह नार्हेडा यांनी तीन संशयित तरुणांना पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावले होते. उपनिरीक्षक नार्हेडा यांनी या तिन्ही तरुणांना अंगावरील कपडे काढायला लावून नग्न करून पट्ट्याने अमानुष मारहाण केली. एवढेच नव्हे तर, त्यांना एकमेकांसोबत लैंगिक चाळे करायला भाग पाडले, असा अत्यंत गंभीर आणि किळसवाणा आरोप त्यांच्याविरोधात करण्यात आलेल्या तक्रारीत उल्लेखित आहे. याच प्रकरणात एका महिलेलाही अश्लील शिवीगाळ करून मारहाण केल्याची तक्रार तिने केली आहे. त्यामुळे याप्रकरणाची गंभीर दखल पोलीस अधीक्षक यांनी घेतली असून त्यांचे तात्काळ निलंबन करून विभागीय चौकशी सुरू करण्यात आलेली आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button