महाराष्ट्रमुंबई
अतिवृष्टीमुळे राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये उद्या शाळांना शासकीय सुट्टी जाहीर
पुढील 48 तास आणखी मुसळधार पावसाची शक्यता
मुंबई:दि-19 राज्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने अनेक नद्या नाले तुडुंब भरून वाहत आहेत.काही शहरांमध्ये रस्त्यावर पुराचे पाणी साचल्याने रस्ते जलमय होऊन प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे.
अशातच मुंबई ,ठाणे, रायगड, पालघर मध्ये सध्या अतिमुसळधार पाऊस पडत असून पुढील 2-3 दिवस असाच मुसळधार पाऊस पडत राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमधील शाळांना 20 जुलै रोजी सुट्टी जाहीर केली आहे. आणखीही काही ठिकाणी परिस्थिती बघून शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.