भंवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाउंडेशन तर्फे कला व साहित्य पुरस्कार जाहीर
जळगाव दि-२२ सप्टेंबर – जैन इरिगेशन सिस्टीम्स
लि. कंपनीची सेवाभावी संस्था भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे तिसरा व्दिवार्षिक ‘कांताई जैन साहित्य-कला जीवनगौरव पुरस्कार’ प्रसिद्ध लेखक, निर्माते,
अभिनेते पद्मश्री सतिश आळेकर (पुणे) यांना तर श्रेष्ठ लेखिका म्हणून बहिणाई पुरस्कारासाठी कवयित्री सुमती लांडे (श्रीरामपूर), श्रेष्ठ कवी म्हणून बालकवी ठोमरे
पुरस्कारासाठी अशोक कोतवाल (जळगाव) तर श्रेष्ठ गद्यलेखक म्हणून ना. धों. महानोर पुरस्कारासाठी सिताराम सावंत ( इटकी ता. सांगोला, सातारा) यांना जाहिर झाला आहे. ‘कांताई जैन साहित्य-कला जीवनगौरव’
पुरस्काराचे स्वरूप दोन लक्ष रूपये, सन्मानचिन्ह, शाल-श्रीफळ असे आहे तर बहिणाई, बालकवी ठोमरे, ना. धों. महानोर या तिघंही पुरस्काराचे स्वरूप एक लक्ष रूपये,
सन्मानचिन्ह, शाल-श्रीफळ असे आहे. साहित्य-कला पुरस्कार प्रदान समितीची बैठक जैन हिल्सवर पार पडली. या बैठकीत निवड समितीचे अध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक ज्ञानपीठ सन्मानित डॉ. भालचंद्र नेमाडे, डॉ. शोभा
नाईक, सौ. ज्योती जैन हे ऑनलाईन उपस्थित होते. तर सदस्य ज्येष्ठ साहित्यीक रंगनाथ पठारे, प्रा. डॉ. सदानंद देशमुख, श्रीकांत देशमुख, डॉ. सिसिलिया कार्व्हालो, शंभू पाटील, भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांची प्रत्यक्ष उपस्थिती होती. सुरवातीला कविवर्य ना. धों. महानोर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या अध्यक्षतेखाली साहित्यीक मान्यवरांकडून आलेल्या शिफारसींचा विचार करून सर्वानुमते चारही पुरस्कारांची निवड करण्यात आली.
‘भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन’ व ‘बहिणाबाई मेमोरियल ट्रस्ट’ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील वाङमयीन क्षेत्रातील जैन इरिगेशनचे कल्याणकारी अंग असलेल्या भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन हा
ट्रस्ट जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा साहित्यिक डॉ. भवरलालजी जैन यांच्या पुढाकारातून साकारला आहे. या ट्रस्टतर्फे विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक
उपक्रमांचे आयोजन केले जाते. साहित्यिक उपक्रमांतर्गत बहिणाबाईंच्या नावे अखिल भारतीय पातळीवर बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टतर्फे बहिणाई पुरस्कार, भंवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे बालकवी ठोंबरे पुरस्कार, तसेच ना. धों. महानोर पुरस्कार दिला जातो. हे
पुरस्कार देण्याबाबतचे बिजारोपण जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांनी केले आहे. काव्य, कथा, कादंबरी नाटक, गद्यलेखन आदी वाङमय लेखनात लक्षणीय
कामगिरी करणाऱ्या साहित्यिकांची निवड करण्यात येते. या पुरस्कारांसाठी महाराष्ट्रातील प्रथितयश कवी, साहित्यिक, समीक्षकांकडून पुरस्कार देण्याबाबतचे बिजारोपण जैन
इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांनी केले आहे. काव्य, कथा, कादंबरी नाटक, गद्यलेखन आदी वाङमय लेखनात लक्षणीय कामगिरी करणाऱ्या साहित्यिकांची निवड
करण्यात येते. या पुरस्कारांसाठी महाराष्ट्रातील
प्रथितयश कवी, साहित्यिक, समीक्षकांकडून शिफारशी मागविण्यात येतात. शिफारस केलेल्या साहित्यिकांच्या कार्याचा आढावा घेऊन निवड समिती अंतिम पुरस्कारार्थींची
निवड करते. स्वरूप एक लाख रुपये, सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे या प्रत्येक पुरस्काराचे स्वरूप आहे. तर ‘कांताई जैन साहित्य-कला जीवनगौरव’ हा व्दिवार्षिक
पुरस्कार असून २ लक्ष रुपये, सन्मानचिन्ह, शाल-श्रीफळ असे याचे स्वरूप आहे.
पहिला पुरस्कार जगप्रसिद्ध शिल्पकार तथा मूर्तिकार राम सुतार, दुसरा जागतिक दर्जाचे चित्रकार प्रभाकर कोलते यांना सन्मानपूर्वक प्रदान केलेला आहे. तर यांना का तिसरा पुरस्कार हा प्रसिद्ध लेखक अभिनेते व निर्माते सतीश आळेकर यांना जाहीर करण्यात आलेला आहे.कला व साहित्य क्षेत्रातील प्रतिभावंतांना प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या कडून सृजनशील लिखाणाचे कार्य घडावे, यासाठी विविध स्तरावर रचनात्मक कार्य जैन इरिगेशनतर्फे सुरूच असते.
भंवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाउंडेशन , भंवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाउंडेशन , बहिणाबाई मेमोरियल ट्रस्ट तर्फे देण्यात येणारे ‘कला साहित्य पुरस्कार’ जाहीर करताना आनंद व्यक्त होत असल्याचे प्रतिपादन भंवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी सांगितले आहे.