इंदूर : भारत आणि ऑस्ट्रेलियामधील दुसऱ्या सामन्यात भारताच्या फलंदाजांनी कांगारूंच्या अक्षरशः चिंधड्या उडवल्या आहेत. 50 षटकांमध्ये भारताने 399 धावांचा डोंगर उभा केला. ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकण्यासाठी 400 धावांचं आव्हान दिलं. यामध्ये भारताच्या शुबनम गिल आणि श्रेयस अय्यर यांची शतके त्यानंतर सूर्यकुमार यादवचं तुफानी अर्धशतकाच्या दमावर भारताने 400 धावांपर्यंत मजल मारली.
भारताची सुरूवात खराब झाली होती, ऋतुराज गायकवाड स्वस्तात परतल्यानंतर शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर यांनी विक्रमी द्विशतकी भागीदारी केली. त्यानंतर के. एल. राहुल आणि ईशान किशन यांनी 59 धावांची भागीदारी केली. त्यानंतर के.एल. सूर्याची 53 धावांची भागीदारी आणि शेवटला जडेजा आणि सूर्याने अवघ्या 26 बॉलमध्ये 44 धावा केल्या होत्या.
गायकवाड आऊट झाल्यावर श्रेयसने आक्रमक सुरूवात केली होती. गडी गॅपने चौकार मारत एकेरी दुहेरी धावा काढत होता. त्यापाठोपाठ शुबमन गिल यानेही आक्रमक पवित्रा घेतला, दोघांनीही कांगारूंच्या गोलंदाजांची सुपारी घेतल्यासारखी दोघेही फोडत होते. भारताकडून भारताकडून सर्वाधिक श्रेयस अय्यरने 90 बॉलमध्ये 105 धावा केल्या, यामध्ये 3 चौकार आणि 3 सिक्सर मारले. त्यापाठोपाठ शुबमन गिल याने सर्वाधिक 104 धावा केल्या. दोघेही बाद झाल्यावर राहुल आणि ईशान किशन यांनी धावगतीला एक्सलेटर दिला होता. मात्र जम्पाला मोठा फटका मारण्याच्या नादात तो 31 धावांवर बाद झाला.
सूर्यकुमार यादव याला मिस्टर 360 डिग्री का म्हणता हे त्यानं आज दाखवून दिलं आहे. वन डे मध्ये पठ्ठ्याने टी-२० स्टाईल फलंदाजी केली.तुफान फटकेबाजी करत त्यांनं सलग ग्रीनला सलग चार षटकार मारले इतकंच नाहीतर त्याने अवघ्या 24 चेंडमध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात जलद अर्धशतक करत विक्रम केला. कमी बॉलमध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध अर्धशतक करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात डीएलएस नियमांनुसार 99 धावांनी विजय मिळवला आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 400 धावांचे आव्हान दिले होते. मात्र ऑस्ट्रेलियाच्या बॅटिंगदरम्यान पावसामुळे दीडपेक्षा अधिक तासांचा खेळ वाया गेला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 33 ओव्हर्समध्ये 317 धावांचं सुधारित आव्हान मिळालं. मात्र टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला 28.2 ओव्हरमध्ये 217 धावांवर ऑलआऊट केलं. टीम इंडियाने या विजयासह 3 सामन्यांची मालिका ही 2-0 अशा एकतर्फी फरकाने जिंकली.
ऑस्ट्रेलियाची बॅटिंग
ऑस्ट्रेलियाकडून सिन एबोट याने अखेरच्या फटकेबाजी करत सर्वाधिक 54 धावा केल्या. तर सुरुवातीला ओपनर डेव्हिड वॉर्नर याने 53 धावांची अर्धशतकी खेळी केली. मार्नस लाबुशेन याने 27 आणि जोश हेझलवूड याने 23 रन्सचं योगदान दिलं. एलेक्स कॅरी याने 14 आणि कॅमरुन ग्रीन याने 19 धावा केल्या. मॅथ्यू शॉर्ट याने 9, जोस इंग्लिस याने 6 आणि एडम झॅम्पा याने 5 धावांची खेळी केली. कॅप्टन स्टीव्हन स्मिथ याला भोपळाही फोडता आला नाही. तर सेपन्सर जॉन्सन झिरोवर नाबाद राहिला.
तर टीम इंडियाकडून शार्दुल ठाकुर दुर्देवी ठरला. शार्दुलला एकही विकेट घेण्यात अपयश आलं. मात्र त्याला 4 ओव्हरच बॉलिंग देण्यात आली. प्रसिद्ध कृष्णा याने एकाच ओव्हरमध्ये 2 विकेट्स घेत टीम इंडियाला चांगली सुरुवात करुन दिली. रवींद्र जडेजा आणि आर अश्विन या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद शमी याने एकमेव विकेट्स घेत इतरांना चांगली साथ दिली.