दिशा सालियन नावाचे भूत काही पिछा सोडेना ! ३ सत्ताधारी आमदारांनी पुन्हा विधानसभेत मुद्दा उचलल्याने आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ
आदित्य ठाकरे ड्रग्स पेडलर असल्याचा वकिलांचा दावा

मुंबई :दि-26/03/25, दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरुन विधिमंडळ सभागृहात आज सत्ताधारी आमदार पुन्हा एकदा प्रचंड आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. दिशाचे वडिल सतिश सालियन यांच्यासह त्यांचे वकिल ॲड निलेश ओझा यांनी काल मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर दिशा सालियान वर सामुहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यासह मुंबईत काही आरोपींसह ड्रग्सचे रॅकेट चालवत असल्याचे विविध प्रकारचे गंभीर आरोप केले असून गुन्हा दाखल करण्यासह अटक करण्याची मागणी केली आहे.
दिशा सालियन प्रकरणात निलेश ओझा यांनी आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह अभिनेता दिनो मोरिया, सूरज पांचोली आणि माजी पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. वकील निलेश ओझा यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, नार्कोटेक्स ब्युरोच्या तपासात हे आढळून आलंय आदित्य ठाकरे हे ड्रग्स बिझनेसमध्ये सहभागी आहेत. त्यासंदर्भाती इतंभू माहिती आम्ही या अर्जात दिली आहे. आदित्य ठाकरे, दिनो मोरिया यांच्या फोन कॉल्ससह समीर खान नावाच्या व्यक्तीची डीएफीपी नावाची कंपनी होती,जी ड्रग्सचे सिंडिकेट चालवत होती.
आदित्य ठाकरे यांचं नाव ड्रग्सच्या बिझनेसमध्ये आल्यानंतर समीर वानखेडे असो किंवा नार्कोटेक्स ब्युरोचे इतर अधिकारी असतील, त्यांना आदित्य ठाकरेंवर कारवाई करण्यासाठी कोणी थांबवलं, असा सवाल ओझा यांनी काल विचारला आहे. त्यामध्ये, किती कोटींची डील झाली असाही सवाल ओझा यांनी विचारला. पोलिस आयुक्तालयात आमची जॉईंट सेक्रेटरी यांच्यासोबत चर्चा झाली, त्यानंतर त्यांनी पोलीस आयुक्तांशी फोनवरुन चर्चा करुन संबंधित प्रकरणात ही तक्रार दाखल करुन घेत असल्याचे म्हटले. त्यानुसार, आता एफआयआर दाखल झाल्याचेही ओझा यांनी सांगितले. आमच्या तक्रारीत आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघेही आरोपी आहेत, अशी माहिती निलेश ओझा यांनी दिली आहे.
विशेष म्हणजे आदित्य ठाकरे यांनी या आरोपांना आतापर्यंत काहीही उत्तर दिलेले नसून ॲड निलेश ओझांना मानहानीची नोटीस देखील दिली नसल्याची माहिती आज समोर आलेली आहे. त्यामुळे या गंभीर प्रकरणाचे गूढ व गांभीर्य वाढलेले असून त्याच अनुषंगाने आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात दिशा सालियन प्रकरणावरुन मोठा गदारोळ पाहायला मिळालं. सुरुवातीला आमदार संजय गायकवाड नंतर भावना गवळी आणि त्यानंतर राम कदम या सत्ताधारी आमदारांनी आदित्य ठाकरे याच्या चौकशीची मागणी करत त्यांच्या आमदारकीचा राजीनामाही घेण्याची मागणी केली आहे. त्यामुळे दिशा सालियन नावाचे भूत काही आता आदित्य ठाकरेचा पिछा सोडणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे विरोधी पक्षातील आमदारांनी हे प्रकरण 5 वर्षे जुनं असून विनाकारण राजकारण केलं जात असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरुन विधानपरिषदेत शिवसेना शिंदे गटाच्या आमदार भावना गवळी यांनी आदित्य ठाकरेंच्या नार्को टेस्टची मागणी केली आहे.
दिशा सालियन प्रकरणावरुन आज विधिमंडळ सभागृहात आमदारांनी वेलमध्ये उतरुन गोंधळ सुरु केल्याचे दिसून आले. दिशा सालियान यांच्या वडिलांनी दिशाच्या हत्येत आदित्य ठाकरे यांचा हात असल्याचा आरोप केलाय. त्यामुळे जसा यापूर्वी संजय राठोड, धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला होता, तसा आदित्य ठाकरे राजीनामा देणार का ? असा प्रश्न शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी विचारला आहे.
सभागृहात आदित्य ठाकरे टार्गेटवर
विधानसभेत आमदार राम कदम यांनीही दिसा सालियनचा मुद्दा उपस्थित केला. सुशांतसिंग राजपूतचा जिथं मृत्यू झाला, तो फ्लॅट उद्धव ठाकरे सरकारने लगेच का परत केला. रिया चक्रवर्तीचे प्रवक्ते हे उबाठाचे नेते आहेत. सुशांतसिंग मृत्यू प्रकरणात उद्धव ठाकरे सरकारची काय भूमिका, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी आमदार राम कदम यांनी केली. तर, काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी ही 5 वर्षांपूर्वीची घटना आहे, असे म्हणत चर्चा करण्याची गरज नसल्याचे मत व्यक्त केले. मघाशी एक सदस्य या विषयावर बोलले, मंत्री बोलले, परत आता तोच विषय काढला जातो. पण, ही 5 वर्षापूर्वीची घटना आहे, असे नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे.