नितीन गडकरी अविरोध का नाही ? नागपुरात सामाजिक कार्यकर्त्यांचे लक्षवेधी कँम्पेन, तर उद्धव ठाकरेंना गडकरींचे प्रत्युत्तर
उद्धव ठाकरेंचे विधान हास्यास्पद -गडकरी
मुंबई दिनांक 13 मार्च, आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी देशभर नेहमी चर्चेत राहणारे आणि ज्यांना महाराष्ट्राचे जनता ‘रोडकरी’ अशा विशेषणाने ओळखते ते भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय रस्ते व अवजड उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी देशभर केलेल्या विक्रमी विकास कामांसाठी त्यांना लोकसभेच्या पुढील महिन्यात होणाऱ्या निवडणुकीत बिनविरोध निवडून देण्यासाठी नागपूरची जनता सरसावली आहे. नितीन गडकरी यांच्यासाठी नागपूरच्या शेकडो नागरिकांनी हातात छोटे पोस्टर घेऊन खासदार नितीन गडकरींची निवड अविरोध का नाही ? अशा आशयाचे पोस्टर घेऊन नागपूरच्या अनेक चौकांमध्ये कॅम्पेन चालवत आहे. विशेष म्हणजे हे नागरिक कोणत्याही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नसून सामाजिक कार्यकर्ते असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. नितीन गडकरी हे स्वच्छ चारित्र्याचे असून सर्वच राजकीय पक्षातील नेते त्यांच्या विकासकामांचे समर्थन करतात. तसेच सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबत गडकरींचे जिव्हाळ्याचे घनिष्ठ संबंध असून कोणीही त्यांच्या विरोधात सहसा रिकामेटेकळे आरोप करत नाही. तसेच या कार्यकर्त्यांनी सर्वच राजकीय पक्षांना नितीन गडकरी यांच्या विरोधात उमेदवार न देण्यासाठी विनंती केलेली आहे. यामध्ये कॅम्पेनमध्ये अनेक सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते समाविष्ट आहेत. यामुळे या अनोख्या लक्षवेधी कॅम्पेनची आता देशभर चर्चा रंगू लागलेली आहे. कारण महाराष्ट्रातील महायुतीतील जागा वाटपाचा तिढा आणि पेच सुटलेला नसल्याने अजून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा झालेली नाही.
उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर गडकरींची प्रतिक्रिया
काही दिवसांपूर्वी भाजपची लोकसभा निवडणूक साठीच्या उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध झालेली असून त्यात महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचे नाव नसल्याचे समोर आले होते. यावरून शिवसेना उभाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोकणातील एका जाहीर सभेत भाजपने पहिल्या यादीत नितीन गडकरींचे नाव नसणे म्हणजे त्यांच्यावर अन्याय झालेला आहे. त्यांनी महाविकास आघाडी यावे आम्ही त्यांना निवडून येऊ असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले होते. या वक्तव्याला नितीन गडकरींनी आज उत्तर देताना म्हटलेलं आहे की उद्धव ठाकरे हे एक अपरिपक्व नेते असून त्यांचे हे विधान हास्यास्पद असल्याचे म्हटलेले आहे. उद्धव ठाकरेंनी आधी आपला पक्ष सांभाळावा असा सल्लाही नितीन गडकरी यांनी उद्धव ठाकरे यांना दिलेला आहे.
दरम्यान, नागपूर शहरात गटकरींच्या समर्थनार्थ कॅम्पेन चालवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी आता नागपूरच्या जनतेने नितीन गडकरींना भाजपची उमेदवारी मिळाल्यास त्यांच्या विरोधात नागपुरात उमेदवार उभे करणार का ? किंवा तसा प्रचार करणार का ? असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारलेला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकीच्या प्रचारात नागपुरात उद्धव ठाकरे हे नितीन गडकरींच्या विरोधात प्रचार करताना त्यांची गोची होणार असल्याचे समजते.