मोदी ,गडकरी की अन्य,कौन बनेगा प्रधानमंत्री,काय आहे शक्यता ? उद्धव ठाकरे गडकरींना पाठिंबा देणार ?
संघाचा विचार निर्णायक ठरणार ?
मुंबई, दिनांक 4 जून, सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांचे निकाल आतापर्यंत आलेल्या कलांवरून जवळपास स्पष्ट झालेले आहे की,मोदी लाट आता धूसर झालेली आहे. भाजप स्वबळावर केंद्रात सत्तेवर येत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे भाजपला इतर राजकीय पक्षांचे टेकू घेण्याची वेळ येऊ शकते,अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशातच आता जर महायुतीसाठी बहुमतासाठी आवश्यक असलेला 272 चा जादुई आकडा गाठणे कठीण झाल्यास भाजप मोदींना डावलून दिग्गज मराठी चेहरा नितीन गडकरी यांचे नाव पंतप्रधान पदासाठी पुढे करू शकते. याचे कारण म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा मराठी बाणा जागृत होऊन ते नितीन गडकरी पंतप्रधान पदासाठी महायुतीला पाठिंबा देऊ शकतात अशा चर्चांना उधाण आलेले आहे.
लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का बसला आहे. मात्र, नागपूर लोकसभा मतदारसंघातून भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठा विजय मिळवला आहे. त्यांनी तब्बल १ लाखाहून अधिक मताधिक्क्याने विजय मिळवला आहे. तर, काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांना पराभव स्विकारावा लागला आहे.
गेल्या सहा वर्षांपासून सलग सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या रस्ते व अवघड वाहतूक मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्री म्हणून नितीन गडकरी यांनी सर्वोत्तम कामगिरी केलेली आहे. गडकरींनी त्यांची त्यांच्या कामामुळे देशभरात वेगळी ओळख निर्माण केलेली आहे.
एकिकडे स्पष्ट बहुमत मिळवण्यासाठी भाजपची धडपड सुरू असतानाच नितीन गडकरी पंतप्रधान होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं आहे. गडकरींचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) नेहमीच चांगले संबंध राहिले आहेत. योगायोगाने त्यांच्या लोकसभा मतदारसंघात आरएसएसचे मुख्यालयही आहे.
नितीन गडकरी हे भाजपचे एक असे नेते आहेत ज्यांच्या नावाला काही विरोधी पक्षांचाही पाठिंबा मिळू शकतो. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सुद्धा नितीन गडकरींच्या नावाला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. मराठी बाणा जपून जर नितीन गडकरी हे पंतप्रधान होणार असतील तर या अटीवर शिवसेना उबाठा पक्ष पुन्हा एनडीएसोबत येऊ शकतो. यामुळे काँग्रेस आणि शरद पवारांच्या एकूण रणनितीला छेद देता येईल. त्यामुळे संघ नरेंद्र मोदी नाही तर यंदा गडकरी सरकार आणण्याचा विचार संघ करु शकतो अशी चर्चा आता सुरू झालेली आहे.