अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे खळबळजनक विधानं
समाजसेवक अण्णा हजारेंचं सूचक विधानं
मुंबई दि-२२ मार्च, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अखेर ईडीने अटक केली आहे. दोन तासांच्या चौकशीनंतर ईडीने केजरीवालांना काल रात्री अटक केली आहे. आतापर्यंत त्यांना 10 समन्स बजावले होते, पण त्यांनी त्याला उत्तरं दिली नाही. अखेरीस अटक करण्यात आली आहे.कालच दुपारी दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता.
दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीने अरविंद केजरीवाल यांना आज दहावा समन्स बजावला होता. ईडीचे सहा ते सात अधिकारी केजरीवाल यांच्या घरी पोहोचले होते. त्यांनी केजरीवाल यांना समन्स जारी केलं होतं. आतापर्यंत दारू घोटाळ्याप्रकारांनी ईडी कडून 8 समन्स देण्यात आले होते. पण केजरीवाल यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. अखेरीस ईडीने केजरीवालांना अटक केली आहे.
दरम्यान अरविंद केजरीवाल यांचे एकेकाळचे सहकारी व गुरु असणारे अण्णा हजारे यांनी मोठे विधान केलेले आहे.ते म्हणालेले आहे ते की, अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्याचं वृत्त पाहून मला वाईट वाटलं. अरविंद केजरीवाल यांच्यासारखा माणूस कधी काळी माझ्याबरोबर काम करत होता. आम्ही दारुविरोधात आवाज उठवला होता. तोच माणूस आता मद्य धोरण बनवतोय, हे पाहून मला खूप दुःख झालं. परंतु, आपण आता काय करू शकतो? आपण सत्तेसमोर काहीच करू शकत नाही. त्यांनी जर त्या गोष्टी केल्या नसत्या (मद्य धोरण बनवणं किंवा कथित घोटाळा करणं) तर आज त्यांना अटक झाली नसती. त्यांना आता अटक झाली आहे. त्यामुळे पुढे जे काही होईल ते कायद्याने होईल अशी आपण अपेक्षा करुया. त्यांचं काय करायचं ते सरकार बघेल.