जळगावमहाराष्ट्रराजकीय
उमेदवार रक्षा खडसेंसह खडसे कुटुंबियांनी बजावला मतदानाचा हक्क, मतदारांना केले मतदानाचे आवाहन
जळगाव -मुक्ताईनगर तालुक्यातील कोरडी गावात मध्ये माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे, पत्नी मंदाकिनी खडसे, रावेर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी सहकुटुंब उपस्थित राहून मतदानाचा हक्क बजावलेला आहे. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर खडसे कुटुंबीयांनी लोकशाही बळकट करण्यासाठी रावेर लोकसभा मतदारसंघातील मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केलेले आहे. तसेच पाऊस वादळ जरी सुरू असले तरी पाऊस थांबल्यानंतर मतदारांनी नवमतदारांसह जागृती करून मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन केलेले आहे. मतदान केल्यामुळे आपली लोकशाही सुदृढ होण्यास मदत होणार असल्याचा आशावाद आमदार एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केलेला आहे.