जळगाव दि- 22/10/24, काही दिवसांपूर्वी भाजपने ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर काल मंगळवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील महायुतीच्या कोट्यातून हक्क असलेल्या सर्व जागांवरील उमेदवार शिवसेनेने जाहीर केले आहे.
दरम्यान,यावेळी भाजपने त्यांचा 35 वर्षांपासूनचा परंपरागतगत मुक्ताईनगर मतदारसंघ यावेळी शिवसेनेला सोडल्याने शिवसेनेने मुक्ताईनगर मतदार संघातून अपक्ष आमदार चंद्रकांत निंबा पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर पालकमंत्री गुलाबराव पाटील हे जळगाव ग्रामीण मतदार संघातून पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर झालेली आहे. तसेच चोपड्याच्या विद्यमान आमदार लता सोनवणे यांच्या ऐवजी त्यांचे पती माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांना पुन्हा एकदा चोपडा अनुसूचित जमाती राखीव मतदार संघातून उमेदवारी जाहीर झालेली आहे.
तर एरंडोल पारोळा मतदार संघातून विद्यमान आमदार चिमणराव पाटील यांचे सुपुत्र अमोल पाटील यांना यावेळी उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे.तर पाचोरा मतदारसंघातून यावेळी सलग तिसऱ्यांदा विद्यमान आमदार किशोर पाटील यांनाच उमेदवारी मिळालेली आहे.
महाविकास आघाडीतील घटक पक्षाकडून अजून पर्यंत कोणत्याही पक्षाने उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. त्यांची यादी एक दोन दिवसात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.