कर्तव्य सतर्कतेमुळे मध्य रेल्वेच्या ९ कर्मचाऱ्यांना महाव्यवस्थापक संरक्षा पुरस्कार
मुंबई दिनांक -१७/१२/२४,मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री धरम वीर मीना यांनी दि. १७.१२.२०२४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात ९ मध्य रेल्वे कर्मचाऱ्यांना संरक्षा पुरस्कार देऊन सन्मानित केले. यामध्ये मुंबई विभागातील ४, भुसावळ विभागातील २, पुणे, नागपूर आणि सोलापूर विभागातील प्रत्येकी १ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
कर्मचाऱ्यांनी ड्युटीवर असताना घेतलेली दक्षता, गेल्या काही महिन्यांत अनुचित घटना रोखण्यात आणि ट्रेन ऑपरेशनमध्ये सुरक्षा सुनिश्चित करण्यात त्यांनी दिलेले योगदान यासाठी हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कारामध्ये पदक, प्रशंसा प्रमाणपत्र, अनुकरणीय संरक्षा कार्यासाठी प्रशस्तीपत्र आणि रु. २०००/- रोख रक्कम असते.
मुंबई विभाग
१. श्री रणजीत सिंग, ट्रेन मॅनेजर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे दि. ०७.१०.२०२४ रोजी ट्रेन क्रमांक 10104, मांडवी एक्स्प्रेसमध्ये ड्युटीवर होते. ट्रेन सिग्नल ६१ वर लाइन क्लिअरन्सची वाट पाहत होती तेव्हा श्री सिंग यांना १/१४६ किलोमीटरवर डाऊन जलद लाईनवर तुटलेली फिश प्लेट दिसली. त्यांनी ताबडतोब येणारी ट्रेन क्र. 17057 देवगिरी एक्स्प्रेसला थांबण्यासाठी लाल सिग्नल दाखवला, आपली ट्रेन सुरक्षित केली आणि सर्व संबंधितांना कळवले. त्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य अपघात टळला.
२. श्री रोहित कौशिक, लोकोपायलट, पनवेल, दि. ०९.१०.२०२४ रोजी कळंबोली यार्ड येथे ड्युटीवर होते. कळंबोली-वाडी भार सी अँड डब्लु टीमने सोडल्यानंतर, जीडीआर दरम्यान श्री कौशिक यांच्या लक्षात आले की पिस्टन रॉडचे वेल्डिंग आणि ब्रेकिंग यंत्रणेचा सपोर्टिंग ब्रॅकेट तुटलेला आणि लटकलेला आहे. श्री कौशिक यांनी तत्काळ सहाय्यक यार्ड मास्तर, कळंबोली यांना माहिती दिली. बिघाड दुरुस्त करून सुरक्षित घोषित केल्यानंतर ट्रेन रवाना झाली. त्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य अपघात टळला.
३. श्री मृत्युंजय कुमार, ट्रॅक मेंटेनर, कल्याण यांनी दि. ३०.१०.२०२४ रोजी दिवा-मुंब्रा विभागात ४१/१००-४२/१०० किलोमीटरवर ड्युटीवर असताना अप मेन लाईनवर टंगरेलवर दरड पाहिली. त्यांनी तत्काळ वरिष्ठ विभाग अभियंता यांना माहिती दिली. एक ब्लॉक घेण्यात आला आणि बदली करून समस्या सोडवली गेली. यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य अपघात टळला.
४. श्री अवधेश कुमार, ट्रॅक मेंटेनर, कर्जत यांनी दि. ०२.११.२०२४ रोजी नागनाथ-पळसधरी सेक्शनवर किलोमीटर १०५/८००-९०० येथे ड्युटीवर असताना जॉइंट लुब्रीकेशन दरम्यान वेल्डिंगमध्ये एक तडा पाहिला. त्यांनी तातडीने सर्व संबंधितांना माहिती दिली. एक ब्लॉक घेण्यात आला आणि बदली करून समस्या सोडवली गेली. त्याच्या सतर्कतेमुळे संभाव्य अपघात रोखण्यासाठी मदत झाली.
भुसावळ विभाग
५. श्री राहुल यशवंत बाविस्कर, तंत्रज्ञ,सी अँड डब्लु, भुसावळ, यांनी दि. ०१.११.२०२४ रोजी मालगाडीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामात, सूक्ष्म तपासणीवर, एका वॅगनच्या सीबीसी कपलिंगमध्ये तडा दिसला, जो सहज लक्षात येऊ शकत नव्हता. त्यांनी तत्काळ सर्व संबंधितांना माहिती दिली आणि बारकाईने लक्ष ठेवल्याने संभाव्य अपघात टळला.
६. श्री रितेश सुमंगल पाली, ट्रॅक मेंटेनर, भुसावळ, दि. ०१.११.२०२४ रोजी कीमन म्हणून ड्युटीवर असताना, अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेस क्रमांक 12833 मधून धूर निघत असल्याचे दिसले. त्यांनी तातडीने सर्व संबंधितांना माहिती दिली. पुढच्या स्थानकावर तपासणी केल्यावर असे आढळून आले की ब्रेक बाइंडिंगचे कारण होते. त्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य अपघात टळला.
पुणे विभाग
७. श्री विश्वनाथ गायकवाड, खलासी, पुणे यांनी दि. ०८.११.२०२४ रोजी ट्रेन क्र. 11077 झेलम एक्स्प्रेसच्या देखभालीच्या कामात सूक्ष्म तपासणी करताना एका डब्याच्या गँगवे प्लेटचे लीफ स्प्रिंग गहाळ झाल्याचे निदर्शनास आले. यामुळे डबे हलवताना त्रास निर्माण झाला असता, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता होती. त्याच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला.
नागपूर विभाग
८. श्री वेंकटरामन, लोको पायलट, ताडाली, नागपूर यांनी दि. ०६.११.२०२४ रोजी शंटिंग ड्युटी दरम्यान तुटलेला चेक रेल्वे ट्रॅक पाहिला. त्यांनी तात्काळ मुख्य ट्रॅक सुरक्षित केला आणि सर्व संबंधितांना माहिती दिली, त्यामुळे संभाव्य अपघात टळला.
सोलापूर विभाग
९. श्री नितीन मोहन शिंदे, ट्रॅक मेंटेनर, लातूर, सोलापूर, दि. १७.०९.२०२४ रोजी गेटमन म्हणून ड्युटीवर असताना, मालगाडीतून जाणाऱ्या मालगाडीचा ब्रेक ब्लॉक जॅम झाल्याचे दिसले. त्यांनी तत्काळ ढोकी स्थानकाच्या स्टेशन मास्तरांना कळवले, तिथे गाडी थांबवून ब्रेक ब्लॉक काढण्यात आला. त्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य अपघात टळला.
या प्रसंगी आपल्या भाषणात, महाव्यवस्थापकांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या कर्तव्याप्रती असलेल्या सतर्कतेचे आणि समर्पणाचे कौतुक केले. अशा प्रकारची दक्षता आणि धाडसी कृत्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रामाणिकपणे काम करण्यासाठी इतरांना प्रेरणा देतील, असे ते म्हणाले.
यावेळी, श्री जगमोहन गर्ग, अतिरिक्त महाव्यवस्थापक आणि प्रधान मुख्य साहित्य व्यवस्थापक; श्री चंद्र किशोर प्रसाद, प्रधान मुख्य संरक्षा अधिकारी; श्री रजनीश माथूर, प्रधान मुख्य अभियंता; श्री एस एस गुप्ता, प्रधान मुख्य परिचालन व्यवस्थापक; श्री सुबोध कुमार सागर, प्रधान मुख्य यांत्रिकी अभियंता; श्री एच.एम. शर्मा, मुख्य विद्युत अभियंता (ऑपरेशन्स), इतर विभागांचे प्रधान प्रमुख आणि मध्य रेल्वेचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.