Advertisement
राजकीय

जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची तडकाफडकी बदली ? काही प्रकरणांची होणार चौकशी ? मोठा प्रशासकीय भूकंप

जळगाव दि-२६/०८/२०२५ : जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची आज अचानक बदली करण्यात आली असून, या निर्णयाने जिल्हा प्रशासकीय वर्तुळात प्रचंड मोठी खळबळ उडालेली आहे. मंत्रालयीन सूत्रांनुसार, प्रशासकीय अनियमितता आणि गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काही आचारसंहिता भंगाच्या दाखल केलेल्या गंभीर तक्रारींच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. आयुष प्रसाद यांच्या कार्यकाळात काही प्रकरणांवरून वाद निर्माण झाले होते, ज्यामुळे आज राज्य शासनाने त्यांच्या बदलीचे आदेश तातडीने जारी केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान , जळगाव जिल्ह्यातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत झालेले गैरप्रकार आणि जिल्हा मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून केलेले गैरव्यवस्थापन, मुक्ताईनगर तालुक्यातील खामखेडा गावाजवळील पूर्णा नदीच्या पात्रात अनधिकृतपणे भराव टाकूनही कारवाई न करणे, जळगाव शहरात काम करणाऱ्या काही राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांमधील कंत्राटदारांना पाठिशी घालणे , अशा विविध कथित अनियमितता आणि प्रशासकीय निर्णयांबाबतच्या तक्रारी आता पुढील आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयात दाखल होणार असून, त्याची विशेष तपास पथकाच्या माध्यमातून आता निष्पक्षपाती चौकशी केली जाणार आहे. जिल्हाधिकारी यांच्याकडे चार्ज राहिला तर काही संशयास्पद प्रकरणांची चौकशीच होणार नाही, अशी ठाम मागणी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे करण्यात आली होती. विशेषत: काही स्थानिक पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या आरोपांमुळे ही कारवाई अपेक्षित होती, नवीन जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती लवकरच होण्याची शक्यता आहे, तर आयुष प्रसाद यांना नवीन जबाबदारी देण्याबाबत शासन स्तरावर चर्चा सुरू आहे. मात्र येणाऱ्या काळात काही संशयास्पद प्रकरणांची चौकशी सुरू होणार असून, यातून कथित अनियमितता आणि भ्रष्टाचार बाहेर येणार असल्याचे संकेत मिळालेले आहेत.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button