पुण्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘लोकमान्यता’
पुणे दि:01- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर येणार आहेत. आता त्यांचे पुणे विमानतळावर आगमन झाले असून ते पुण्यातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. दरम्यान, त्यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केलं आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार असे दिग्गज नेते व्यासपीठावर उपस्थित होते. पंतप्रधान मोदींच्या पुरस्कार सोहळ्यात शरद पवार स्वतः जातीने हजर राहणार असल्याने विरोधी पक्षांमध्ये नाराजी आहे.विशेष म्हणजे या पुरस्कार सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी स्वतः शरद पवार हेच गेले होते. त्यांच्याच उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना या सोहळ्यात ‘लोकमान्यता’ देण्यात आल्याचं आजच्या कार्यक्रमात दिसून आले.
समृद्धी महामार्गावर दुसरा मोठा अपघात,गर्डर बसवताना क्रेन कोसळून 17 ठार
शरद पवारांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहू नये, अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे. दुसरीकडे, मणिपूर हिंसाचार प्रकरणावरून पुण्यात मोदींविरोधात आंदोलन करण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने घेतली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
पुणे-नगर महामार्गावर दोन बस जोरदार धडकल्या, काचा फोडून प्रवाशांना बाहेर काढले
पुणे दि:1 राष्ट्रवादीतील फुटीनंतर आज पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पुण्यात एकाच मंचावर उपस्थित असल्याचे चित्र दिसून आले.याला निमित्त होते ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येणाऱ्या लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्याचे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज पुण्यात ट्रस्टच्या वतीने लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमावेळी पुणेकर मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. लोकमान्य टिळक यांच्या ओळख असलेली पुणेरी पगडी यावेळी पंतप्रधानांना घालण्यात आली. पुरस्काराचं सन्मानपत्र, ट्रॉफी देण्यात आली. या ट्रॉफीत भगवत गीता, लोकमान्यांची पगडी, केसरी वृत्तपत्राचा पहिला अंक आणि लोकमान्यांची प्रतिमा आहे. नरेंद्र मोदी यांनी मराठीतून भाषणाची सुरुवात केली. यावेळी त्यांनी टिळक पुरस्कार माझ्या जीवनातील अविस्मरणीय क्षण असल्याचं म्हटलं. तसेच त्यांनी काशी आणि पुण्याचं साम्य देखील आपल्या भाषणात सांगितल आहे.
उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी लाल बाल आणि पाल या तिन्ही नावांची आणि इंग्राजांच्या काळाची आठवण करुन दिली.” स्वातंत्र्याच्या काळात इंग्रजांनी टिळकांवर फार अन्याय केला. त्यावेळी स्वातंत्र्यासाठी टिळकांनी त्याग आणि बलिदानाची पाराकाष्टा केली. यावेळी त्यांच्यासोबत लाला लजपतराय आणि बिपिन चंद्र पाल यांच्यातील विश्वास भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील सुवर्ण अध्याय आहे. आजही लाल बाल आणि पाल ही तिन्ही नावे त्री शक्तीच्या रुपाने आठवली जातात”,असं यावेळी मोदी म्हणाले.
ट्रस्टमध्ये कोण?
टिळक स्मारक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष लोकमान्य टिळकांचे पणतू दीपक टिळक आहेत. टिळक हे काँग्रेस समर्थक म्हणून ओळखले जातात. लोकमान्य टिळकांनीच काँग्रेसला लोकांपर्यंत नेण्यासाठी बरेच प्रयत्न केल्याचे दाखले दिले जातात. दीपक टिळक यांचे वडील जयंतराव टिळक यांनी हिंदू महासभेमधून कामाला सुरुवात केली. मात्र 1950 च्या दशकामध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ते राज्यसभेचे खासदार आणि नंतर महाराष्ट्र राज्याच्या विधानपरिषदेचे अध्यक्ष झाले.
कोणाकोणाला देण्यात आला आहे हा पुरस्कार?
पंतप्रधान मोदींच्या आधी हा पुरस्कार माजी राष्ट्रपती डॉ. शंकर दयाल शर्मा आणि प्रणब मुखर्जींना प्रदान करण्यात आला आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, इंदिरा गांधी, मनमोहन सिंग यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. तसेच एस. एम जोशी, शरद पवार त्याशिवाय प्रसिद्ध उद्योजक आर. नारायणमूर्ती, मेट्रोमॅन म्हणून प्रसिद्ध असलेल्या ई. श्रीधरन ,सायरस पुनावाला यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. एकूण 40 जणांना आतापर्यंत हा पुरस्कार देण्यात आला आहे.