भाजपचा अयोध्येत पराभव ! प्रभू श्रीरामचंद्र रुसले ? की,शंकराचार्यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला न येण्याचा प्रभाव ?
नवी दिल्ली ,दि-५ जून,२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडे राम मंदिराचा मुद्दा होता. पण हा मुद्दा भाजपसाठी संजीवनी ठरलेला नाही. कारण या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. राम मंदिराचा मुद्दा गाजला पण जेथे राम मंदिर आहे त्याच अयोध्येत भाजपला पराभवाचा जबर धक्का बसलेला आहे. भाजपकडे राम मंदिर हा या निवडणुकीतला सर्वात मोठा मुद्दा होता. पण या मुद्दयावर त्यांना मते मिळालेली दिसत नाहीत.भाजपने राम मंदिरावरुन जोरदार वातावरण निर्माण केले होते. प्रत्येक भाषणात राम मंदिराचा उल्लेख करण्यात आला होता. पण उत्तर प्रदेशात भाजपला मोठा धक्का बसला आहे. योगी आदित्यनाथ यांच्यासाठी देखील ही आत्मचिंतनाची निवडणूक ठरली आहे. कारण अयोध्येतच भाजपचा मोठा पराभव झाला आहे. एक प्रकारे प्रभू श्रीरामचंद्र भाजपला प्रसन्न झालेले नसून भाजपवर रुसल्याचे बोलले जात आहे. तर काहींनी श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याला काही शंकराचार्यांनी शुभ मुहूर्त नसल्याचे सांगत येण्याचे टाळले होते. तर काहींनी राम मंदिराचे बांधकाम अपूर्ण असल्याने घाईगडबडीत धार्मिक विधीनुसार प्राणप्रतिष्ठा करता येत नसल्याचे सांगितले होते. अशा विविध कारणांनी काही शंकराचार्यांनी या सोहळ्याला न येणे याचा देखील निवडणुकीवर प्रभाव पडल्याचे बोलले जात आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी 2024 मध्ये
अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा आणि लोकार्पण सोहळा पार पडला होता. नरेंद्र मोदी यांच्याहस्ते हा संपूर्ण सोहळा पार पडला. परंतू लोकसभा निवडणुकीत याचा फायदा मिळवण्यात भाजप अपयशी ठरली. विरोधी पक्षांनी राम मंदिराच्या या सोहळ्याला भाजपचा कार्यक्रमाला म्हणत स्वतःला दूर केले होते.
तर दुसरीकडे भाजपशासित राज्यांचे मंत्री आणि मुख्यमंत्री हे स्पेशल रेल्वेगाडीने सातत्याने राम मंदिराला भेट देत आहेत,जेणेकरून राम मंदिराचा मुद्दा निवडणुकीपर्यंत तापत राहील. मात्र, आता निकाल पाहता भाजपचे हे धोरण अयोध्येतील जनतेला पसंत पडले नसल्याचे दिसून येत आहे.
राम मंदिर असलेल्या उत्तर प्रदेशातील फैजाबाद लोकसभा मतदारसंघातील अयोध्येत भाजप उमेदवाराला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. अयोध्येतील विमानतळापासून विकासापर्यंत सर्व काही केल्याचा योगी सरकारने दावा केला असला तरी मात्र समाजवादी पक्षाने राज्यातील ही सर्वात लोकप्रिय जागा जिंकलेली आहे.
फैजाबाद लोकसभा मतदारसंघातून भाजपचे लल्लू सिंह यांचा सपाचे अवधेश प्रसाद यांनी पराभव केलाय.
समाजवादी पक्षाचे अवधेश प्रसाद यांना एकूण 554289 मते पडली तर, भाजपचे लल्लू सिंग यांना 499722 इथे मते पडलेली आहे. या ठिकाणी 54,567 मतांनी अवधेश प्रसाद यांचा विजय झालेला आहे.