भुसावळच्या जगन सोनवणेंना अखेर मिळाली उमेदवारी, विधानसभेच्या रणांगणात आ.संजय सावकारेंशी थेट लढत
मुंबई दिनांक-20/10/24, महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने आज उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली आहे. यामध्ये 16 उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे. पाचव्या यादीमध्ये देखील वंचित बहुजन आघाडीने विविध समाज घटकांतील उमेदवार दिले आहेत. यापूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी तर्फे जळगाव जिल्ह्यातील रावेर आणि चोपडा येथील उमेदवारांच्या नावाची घोषणा केली होती. भुसावळ शहरात नेहमी आपल्या विविध आंदोलनांनी चर्चेत असणारे जगन सोनवणे यांना यावेळी वंचित बहुजन आघाडी कडून उमेदवारी मिळालेली आहे. गेल्यावेळी ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून निवडणूक लढले होते. कालच भुसावळचे विद्यमान आमदार संजय सावकार यांना भाजप कडून पुन्हा एकदा संधी मिळालेली असून त्यांच्या विरोधात स्थानिक तुल्यबळ उमेदवार म्हणून जगन सोनवणे यांच्याकडे पाहिले जात आहे. त्यामुळे विद्यमान आमदार संजय सावकारे विरुद्ध जगन सोनवणे अशी थेट लढत होण्याचे संकेत मिळालेले आहेत. तर दुसरीकडे अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून या ठिकाणी उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून डॉ राजेश मानवतकर, संगीता भामरे , राजेश झाल्टे यांच्यासह अनेक इच्छुक उमेदवार असून काही उमेदवार हे बाहेरच्या मतदारसंघातील असून ते सुद्धा निवडणूकीच्या रणांगणात येणार आहेत.
वंचित बहुजन आघाडीच्या पाचव्या यादीतील उमेदवार
1) जगन देवराम सोनवणे – भुसावळ
2) डॉ. ऋतुजा चव्हाण – मेहकर
3) सुगत वाघमारे – मूर्तीजापूर
4) प्रशांत सुधीर गोळे – रिसोड
5) लोभसिंग राठोड – ओवळा माजिवडा
6) विक्रांत चिकणे – ऐरोली
7) परमेश्वर रणशुर – जोगेश्वरी पूर्व
8) राजेंद्र ससाणे – दिंडोशी
9) अजय रोकडे – मालाड
10) ॲड. संजीवकुमार कलकोरी – अंधेरी पूर्व
11) सागर गवई – घाटकोपर पश्चिम
12) सुनीता गायकवाड – घाटकोपर पूर्व
13) आनंद जाधव – चेंबूर
14) मंगलदास निकाळजे – बारामती
15) अण्णासाहेब शेलार – श्रीगोंदा
16) डॉ. शिवाजीराव देवनाळे – उदगीर