जळगावमहाराष्ट्रराजकीय
मंत्री गुलाबराव पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क, मतदारांना केले मतदानाचे आवाहन
जळगाव – जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज त्यांच्या पाळधी गावातील मतदान केंद्रावर सकाळीच मतदानाचा हक्क बजावला आहे.
तसेच जळगाव जिल्ह्यातील मतदारांना मतदान करणे हा आपला अधिकार असून लोकशाही बळकट करण्यासाठी सर्व मतदारांचे कर्तव्य आहे. म्हणून सर्व मतदारांनी स्वतःहून मतदानाला जाऊन मतदान करण्याचे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील जनतेला केलेले आहे. यावेळी त्यांचे चिरंजीव माझी जि प सदस्य प्रताप पाटील व नागरिक उपस्थित होते.