रक्षा खडसेंचा मार्ग मोकळा करण्यासाठीच एकनाथ खडसेंची माघार – सतिशअण्णा पाटलांची खदखद बाहेर
जळगाव दि-16, रक्षा खडसेंना भाजपकडून रावेर लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्या दिवसांपासूनच लोकांनी अंदाज लावायला सुरूवात केली होती की, एकनाथराव खडसे हे आता लोकसभा निवडणुकीतून नक्कीच माघार घेतील ,आणि रक्षा खडसेंचा विजयाचा मार्ग सुकर करतील. सर्व लोकांचाच हा कयास होता जसा माझाही तोच कयास आहे. अशी जाहीर खदखद माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते सतीश अण्णा पाटील यांनी बोलून दाखवलेली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या नेत्यांमध्ये एकनाथराव खडसेंच्या भूमिकेबाबत नाराजीचा सूर असल्याचे समोर आलेलं आहे.
गेल्या काही महिन्यांपासून एकनाथराव खडसे हे समोर कोणीही उमेदवार असो मी कोणत्याही परिस्थितीत लोकसभा निवडणूक लढवणारच अशी गर्जना करीत होते. मात्र त्यांनी आता तब्येतीचे कारण सांगत माघार घेणं योग्य नाही, अशी प्रतिक्रिया सतिश अण्णा पाटील यांनी व्यक्त केली आहे.
तसेच , रवींद्रभैय्या प्रल्हाद पाटील हे आमच्याकडे आता सर्वात सक्षम व प्रबळ उमेदवार असून त्यांना उमेदवारी मिळायला हवी अशी मागणीही त्यांनी केली आहे.