राज्य उत्पादन शुल्कच्या ‘त्या’ उपनिरीक्षकाच्या घरातून ३ तोळे सोन्यासह मोठं घबाड जप्त, भुसावळात पुन्हा मोठी कारवाई
भुसावळ दि-29/11/2024, अवैध दारू विक्री केल्याप्रकरणी एका विक्रेत्याविरोधात गुन्हा दाखल न करण्याबाबत लाच घेताना यावल तालुक्यातील फैजपुर पोलीस स्टेशन, गु.र.नं. २८८/२०२४, भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ (अ) १२ प्रमाणे दि-२३/११/२०२४ रोजी मुख्य आरोपी क्र.१ राजकिरण सोनवणे, उपनिरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, भुसावळ, रा. भुसावळ व आरोपी क. २ किरण माधव सूर्यवंशी, वय ३७ वर्ष,रा. नवीन हुडको, भुसावळ (खाजगी ईसम) यांचे विरुध्द गुन्हा दाखल आहे. त्या अनुषंगाने तपास सुरू असताना सदर गुन्ह्यातील आरोपी राजकिरण सोनवणे हे राहते घरी भुसावळ येथे मिळून न आल्याने त्यांचे राहते घर सिलंबद करण्यात आले होता.तो फरार असल्याने अद्याप पावेतो मिळुन आलेला नसल्याने त्यांचे नातेवाईकांशी देखील संपर्क होवु शकला नाही. म्हणून मा. विशेष न्यायालय, भुसावळ यांच्या आरोपी क्र.१ राजकिरण सोनवणे यांचे भुसावळ येथील राहते घराची घर झडती घेणेकरिता सर्च वॉरंट घेण्यात आले होते. त्याप्रमाणे आज दि.२९/११/२०२४ रोजी सकाळी ०७.३० वाजेपासून दोन पंच, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व व्हिडीओ ग्राफर कॅमेरासह, फरार आलोसे क.१ राजकिरण सोनवणे हे भाडेतत्वावर राहत असलेल्या घराचे मुळ घर मालक यांचे उपस्थितीत त्यांची घर झडती घेण्यात आली असता त्यात ३ तोळे सोन्यासह खालील नमुद मोठा मुद्देमाल मिळून आला आहे.यामुळे अनेकांचे डोळे विस्फारले आहेत.
१) १,४९,२९० /- रुपये किमतीच्या २१४४ देशी विदेशी दारुच्या विविध ब्रॅन्डच्या बाटल्या.
२). २,५०० /- रुपये किमतीची दोन प्लॅस्टीकच्या कॅन मध्ये २५ लिटर गावठी हातभटटीची दारु
३). २,१५,२५४ /- रुपये किमतीची बुलेट मोटर सायकल
४).१४,००,०००/- रुपये किमतीची किया सेलटॉस कारचे पेपर्स
५) १,५०,००० /- रुपये किमतीचे ३ तोळे सोन्या चांदीचे दागीने
६). ००.०० /- रुपये किमतीचे ९ एम.एम. पिस्टल च्या दहा रिकाम्या पुंगळया
७.) १,९१,००० /- रुपये रोख रक्कम
८) १७,९०,००० /- रुपये किमतीच्या सोने चांदी खरेदी केल्याच्या मुळ पावत्या.
९).२,००,०००/- टी. व्ही. फ्रिज. ए. सी. इतर वस्तु तसेच बँकेचे व ईतर कागदपत्रे
असा एकूण ४० लाख ९८,०४४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
फरार असलेला PSI राजकिरण सोनवणे यांचे राहते घरी वर प्रमाणे मिळुन आलेल्या देशी/ विदेशी / हातभट्टी दारुच्या अवैध मद्यसाठा बाबत पुढील कारवाई करण्यात येत आहे. सदरची घरझडती कारवाई मा. श्रीमती शर्मिष्ठा घागरे वालावलकर, पोलीस अधिक्षक ला.प्र.वि. नाशिक परिक्षेत्र नाशिक, श्री. योगेश जी ठाकूर, पोलीस उपअधीक्षक ला.प्र.वि. जळगांव यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे करीत आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगांव तर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये कोणी शासकीय अधिकारी / कर्मचारी किंवा त्यांचे वतीने कोणी खाजगी इसम लाचेची मागणी करीत असतील तर कृपया लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगांव कार्यालयाशी ०२५७-२२३५४७७ किंवा टोल फ्रि क्रमांक १०६४ यावर संपर्क साधुन निर्भिडपणे या कार्यालयाकडे तक्रार नोंदवावी.