राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज मुंबई उच्च न्यायालयात तब्बल ‘इतक्या’ न्यायमूर्तींची नियुक्ती का केली ?
हायकोर्टात तब्बल ७ लाख प्रकरणे प्रलंबित
नवी दिल्ली , 22 मार्च 2024, संपूर्ण देशभरात दिवाणी आणि फौजदारी खटल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून लाखो न्यायालयीन खटले प्रलंबित आहेत. मुंबई उच्च न्यायालयात तब्बल ७ लाख खटले प्रलंबित आहेत. यातील ८३ टक्के खटले हे दिवाणी न्यायालयात प्रलंबित आहे. यामुळे न्याय निवडा कधी मिळणार या प्रतीक्षेत सामान्य नागरीक आहेत. तसेच मुंबई उच्च न्यायालयातफक्त १ लाखांहून अधिक खटले हे गुन्हेगारीशी संबंधित आहेत तर ३१०० हून अधिक जनहित याचिका प्रलंबित आहेत. प्रलंबित असलेले खटले हायकोर्टाची सर्व खंडपीठे, मुंबई येथील प्रधान खंडपीठ, औरंगाबाद, नागपूर येथील खंडपीठे आणि गोवा येथील बॉम्बे हायकोर्ट येथील आहेत. प्रलंबित प्रकरणांपैकी, १.५ लाखांहून अधिक रिट याचिका आहेत, तर ३१०० हून अधिक जनहित याचिका (पीआयएल) आहेत. २ लाखांहून अधिक प्रकरणे अंतरिम जामीनासाठी दाखल करण्यात आले आहे. तर ७ हजार जामीन अर्ज प्रलंबित आहेत. ५८७ खटले ३० वर्षांपासून प्रलंबित आहेत. तसेच तातडीच्या रिट याचिका, देशद्रोह व फौजदारी याचिका, जनहित याचिका, अपिलार्थ याचिका, दया याचिका,पुनर्विचार याचिका, सुमोटू याचिका, हस्तक्षेप याचिका,आणि इतर जामिना संबंधीच्या प्रकिया आणि विशेष न्यायालयीन परवानग्या यांसारख्या याचिका प्रलंबित असून न्यायमूर्तींचे संख्याबळ त्या मानाने खूपच अत्यल्प होते. त्यामुळे न्यायव्यवस्थेवर सुद्धा न्यायदान करताना कामाचा मोठा ताण आलेला आहे. हजारो प्रलंबित याचिकांपैकी काही याचिका या दीर्घ काळापासून प्रलंबितच आहे. या सर्व याचिकांचा वेळेत सुनावणी घेण्यासाठी आणि जलद निपटारा करून सर्व सामान्य माणसाला वेळेत आणि विनाविलंब न्याय मिळवून देण्यासाठी आणि प्रकरणांचा न्यायनिवाडा सुलभ होण्यासाठी न्यायमूर्तींची संख्या वाढवण्याची मागणी न्यायपालिकेकडून राष्ट्रपतींना करण्यात आली होती. याची दखल घेत भारतीय राज्यघटनेने बहाल केलेल्या अधिकाराचा वापर करत, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील काही उच्च न्यायालयांमध्ये मुख्य न्यायाधीश आणि अतिरिक्त न्यायमूर्तींच्या कायमस्वरूपी नेमणुका केलेल्या आहेत. त्यापैकी मुंबई उच्च न्यायालयात देखील सर्वाधिक मुख्य न्यायमूर्ती आणि अतिरिक्त मुख्य न्यायमूर्ती यांच्या नेमणुका केलेल्या असून त्याची तपशीलवार यादी खालीलप्रमाणे आहेत : –
1) यु.एस.जोशी-फाळके
2) भरत पांडुरंग देशपांडे
3) किशोर चंद्रकांत संत
4) वाल्मिकी एस.ए.मेनेझेस
5) कमल रश्मी खत
6) एस.यु.देशमुख
7) अरुण रामनाथ पेडणेकर
8) संदीप विष्णुपंत मारणे
9) गौरी विनोद गोडसे
10) राजेश शांताराम पाटील
11) आरिफ सालेह