क्राईम/कोर्टजळगावपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकीय

सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील संशयित वाल्मीक कराडचे सरेंडर, सीआयडीच्या तपासात नवे खुलासे होण्याची शक्यता

मुंबई दि-३१/१२/२४, बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि पवन ऊर्जा कंपनीला दोन कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी संशयित वाल्मिक कराडचे नाव समोर आले होते .विरोधकांनी सातत्याने कराडवर टीका केली. कराड हा मंत्री मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचा आरोप करण्यात आला होता. प्रकरण आणखीच तापल्यानंतर वाल्मिक कराड गायब झाला होता. त्याचा कसून शोध घेतला जात होता. अखेर वाल्मिक कराडने आज शरणागती पत्करली असल्याची माहिती समोर आलेली आहे.संतोष देशमुख आतापर्यंत चार आरोपीला अटक करण्यात आली होती. तर तीन आरोपी फरार होते. या प्रकरणाचा तपास सीआयडी करत असून गेल्या 4 दिवसांपासून सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी जिल्ह्यात तळ ठोकून आहेत. या प्रकरणाचा मास्टरमाईंड म्हणून वाल्मिक कराडचे नाव घेतले जात आहे. सीआयडीने वाल्मिक कराडच्या भोवती तपासाचा फास आवळला. संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर वाल्मिक कराडचे नाव घेऊन आरोप होऊ लागले होते. सीआयडीने आपल्या वाल्मिक कराडच्या निकटवर्तीयांची कसून चौकशी सुरू केली होती.

देशमुख प्रकरणाच्या तपासासाठी सीआयडीची 9 पथके
संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये बीडमध्ये जवळपास सीआयडीच्या 9 टीम कार्यरत आहेत. टीममध्ये सुमारे दीडशेहून अधिक सीआयडीचे अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत. या सर्व टीमने सुमारे 100 हून अधिक लोकांची या प्रकरणांमध्ये आतापर्यंत चौकशी केली. वाल्मिक कराडवर सीआयडीने आपला दबाव वाढवण्यास सुरुवात केली. या प्रकरणातील आरोपींचे बँक खाते गोठवण्यात आले. तर, संपत्ती जप्तीची कारवाई सुरू करण्यात आली.
खुलेआम फिरत होता कराड  ?
वाल्मिक कराड याला ताब्यात घेण्यासाठी CID जंगजंग पछाडत होती. 11 डिसेंबर रोजी वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल होता. त्यानंतरही वाल्मिक कराड हा सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टिव्ह असल्याचे दिसून आले. नागपूर हिवाळी अधिवेशनात नागपूरलाही वाल्मिक कराडने काहीजणांना भेटीगाठी घेतल्या होत्या. तरीदेखील कराडकडे कोणाचेही लक्ष गेले नाही.
दोन महिलांची चौकशी अन्  नवा व्टिस्ट…
सीआयडीकडून वाल्मिक कराड प्रकरणात रविवारी दोन महिलांची चौकशी करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या दोन्ही महिलांची दुपारी 12 वाजेपासून तब्बल नऊ तास संध्या सोनवणे यांची चौकशी करण्यात आली. संध्या सोमवणे या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या युवती प्रदेश अध्यक्षा आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेडच्या रहिवासी आहेत. जामखेड मध्ये भव्य जयंती उत्सव साजरे करणे यातून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. संध्या सोनवणे यांनी अहिल्या नगर जिल्ह्याच्या युवती जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्याशिवाय जामखेड जवळील नायगाव येथे ग्रामपंचायत सदस्य आहेत.
दुसरी महिला कोण ?
वाल्मिक कराड यांच्याशी संबंधित आणखी एका महिलेची चौकशी करण्यात आली. सीआयडीने चौकशी केलेली महिला ही वाल्मिक कराडची निकटवर्तीय असल्याची माहिती आहे. वाल्मिक कराडकडून या महिलेशी संपर्क साधला गेला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने ही चौकशी झाली असल्याचे म्हटले जात आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button