वंदे भारत ‘बस’, वंदे भारत एक्स्प्रेस नंतर नवाप्रयोग, महाराष्ट्रात लागली उत्सुकता, जाणून घ्या कधी येणार ?
खगरिया बिहार (वृत्तसंस्था) – #vande Bharat bus महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत सर्वाधिक वंदे भारत एक्स्प्रेस भेट दिलेल्या असून त्यानंतर वंदे भारत मेट्रो या नवीन प्रकल्पावर संशोधन व विकास कार्यक्रम सुरू आहे. अशातच आता बिहारच्या खगरिया जिल्ह्यातील रस्त्यावर चक्क वंदे भारत एक्स्प्रेस सारखी हुबेहूब आकार व रचना दिसणारी बस दिसली. लोकांनी ही वंदे भारत बस असल्याचे म्हणत ही बस पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. अनेकांनी सेल्फी आणि रील्स काढायला सुरुवात केली. सोशल मीडियावरही लोकांनी खूप गमतीशीर पोस्ट केल्या आहेत.एका युजरने म्हटलं की ही निर्मिती फक्त बिहारमध्येच राहिली पाहिजे, बिहारच्या बाहेर जाऊ नये.
ही बस रस्त्यावर पाहून लोक आश्चर्यचकित झाले. वास्तविक ही modified बस असून ही बस पाहण्यासाठी लोकांची तुफान गर्दी झाली होती. .
सोशल मीडियावरील मजेदार प्रतिक्रिया
सोशल मीडियावर या वंदे भारत बसला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. लोक अशा कमेंट करत आहेत की त्या वाचून तुमचं हसू आवरणार नाही. या बससोबत लोक सेल्फी घेतानाही दिसत होते. अनेक जण रील्स बनवतानाही दिसत होते. विशेष म्हणजे बिहार मध्ये अजून वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झालेली नाही.
सोशल मिडियावर जयंत कुमार नावाचा युजर म्हणाला, व्वा आज मला वंदे भारत बसमध्ये चढण्याची संधी मिळाली, रॉय नावाच्या यूजरने अभियंत्यांना सलाम असे लिहिले, तर पारस नाथ राय नावाच्या वापरकर्त्याने जय बिहार आणि जय बिहारचे अभियांत्रिकी असे लिहिले. एका यूजरने लिहिले की, ही निर्मिती फक्त बिहारमध्येच पाहायला मिळते.
अनेकांना त्याचे भाडे जाणून घ्यायचे होते. एका यूजरने लिहिले की, ही कल्पना बिहारच्या बाहेर जाऊ नये.
आता महाराष्ट्रात ही वंदे भारत बस कधी येते याची महाराष्ट्रात जोरदार उत्सुकता लागलेली आहे.