सर्वोच्च न्यायालयात आज महामहीम राष्ट्रपतींनी दोन मुख्य न्यायमूर्तींची नियुक्ती केली
सुप्रीम कोर्टात 34 पैकी 32 न्यायाधीशांची नियुक्ती पूर्ण
दिल्ली, दि:-12 राष्ट्रपतींनी न्यायमूर्ती उज्वल भुयान आणि न्यायमूर्ती एसव्ही भट्टी यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने गेल्या आठवड्यात यांच्या पदोन्नतीची शिफारस केली होती. न्यायमूर्ती उज्वल भुयान हे सध्या तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहे. आणि न्यायमूर्ती भट्टी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत .आता या दोघा न्यायमूर्तींच्या नियुक्तीमुळे सर्वोच्च न्यायालयातील मंजूर 34 पैकी 32 न्यायाधीशांची नियुक्ती झालेली आहे.
न्यायमूर्ती नियुक्तीचे निकष असे
1) मुख्य न्यायमूर्ती आणि त्यांच्या संबंधित उच्च न्यायालयातील वरिष्ठ न्यायाधीशांची ज्येष्ठता
2) उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची एकूण ज्येष्ठता
3) विचाराधीन न्यायाधीशांची गुणवत्ता, कामगिरी आणि सचोटी
4) सर्वोच्च न्यायालयात विविधता व सुनिश्चित करण्याची गरज
5) सर्वोच्च न्यायालयातील प्रतिनिधित्व नसलेल्या किंवा अपर्याप्तपणे प्रतिनिधित्व केलेल्या उच्च न्यायालयांचे प्रतिनिधित्व केलेलं असावे.
दोन्ही न्यायमूर्तींची कारकिर्द अशी
न्यायमूर्ती उज्वल भुयान यांची 17 ऑक्टोबर 2011 रोजी गुवाहाटी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ते सध्या त्यांच्या मूळ उच्च उच्च न्यायालयाचे सर्वात वरिष्ठ न्यायाधीश आहेत आणि सध्या ते 28 जूनपासून तेलंगणा राज्यासाठी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत.
तर, न्यायमूर्ती एस व्यंकटनारायण भट्टी यांची 12 एप्रिल 2013 रोजी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती आणि ते त्यांच्या मूळ उच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ आहेत. मार्च 2019 मध्ये त्यांची केरळ उच्च न्यायालयात बदली झाली आणि सध्या ते 01 जून 2023 पासून केरळचे मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यरत आहे.