एकनाथराव खडसेंनी आमदारकीचा राजीनामा दिला का ?विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हेंचा खुलासा
जळगाव – दोन दिवसांपूर्वी एकनाथराव खडसे यांनी स्वतः ते भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिलेली आहे.गेल्या काही दिवसांपासून खडसेंनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये म्हटलेलं होत की, माझे नरेंद्र मोदी,अमित शहा ,जेपी नड्डा यांच्याशी पूर्वीपासून घनिष्ठ संबंध असून मला भाजपात जायचे असल्यास शरद पवारांना विचारून भाजपमध्ये जाईल अशी प्रतिक्रिया दिलेली होती.
दरम्यान, तीन वर्षांपूर्वी एकनाथराव खडसे हे पक्षांतर्गत कुरघोड्यांना कंटाळून शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला होता. तसेच शरद पवारांनी एकनाथराव खडसेंना विधान परिषदेचे सदस्यत्व सुद्धा बहाल केलेले होते. त्यानंतर मात्र खडसेंचे राष्ट्रवादीत मन लागत नव्हते. तसेच त्यांनी गेल्या वर्षभरापासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेल्या वैयक्तिक वादाला शांत स्वरूप दिलेले असून कोणत्याही प्रकारची टीका केलेली दिसली नाही. त्यामुळेच एकनाथराव खडसे हे लवकरच भाजपा प्रवेश करण्यात असल्याची माहिती सर्वप्रथम ‘मीडियामेल ‘ न्यूजने प्रकाशित करून खळबळ उडवून दिलेली होती.
दरम्यान, गेल्या महिन्याभरापासून एकनाथराव खडसे हे भाजपात येण्यासाठी प्रचंड इच्छुक होते, मात्र राज्यातील स्थानिक नेत्यांचा त्यात अडथळा निर्माण होत होता, अशी माहिती समोर आलेली आहे. मात्र राज्यातील सर्वच वरीष्ठ नेत्यांना भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे वरचढ ठरलेले असून त्यांनीच खडसेंची गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घालून सविस्तर चर्चा करून एकनाथराव खडसेंच्या घरावापसीचे प्रयत्न केलेले आहेत. एक प्रकारे विनोद तावडे हे राज्यातील भाजपच्या शीर्ष नेतृत्वाला वरचढ ठरल्याचे दिसून येत आहे.
खडसेंनी आमदारकीचा राजीनामा दिला का ?
काल रात्री विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मोठा खुलासा केलेला आहे. त्यांना विचारण्यात आले होते की, राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी ते भाजपा जाणार असल्याची माहिती माध्यमांना दिलेली असून त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा आपल्याकडे दिलेला आहे का ? या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी मिश्किलपणे घड्याळाची वेळ बघून सांगितले की, या क्षणापर्यंत तरी माझ्याकडे एकनाथ खडसे यांचा राजीनामा अजून तरी प्राप्त झालेला नाही. असा खुलासा उपसभापती नीलम गोरे यांनी केलेला आहे.